आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

..हेची दान देगा देवा... आता पाऊस पडू दे’ची आर्त विनवणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- आषाढीएकादशीला भाविकांनी ‘हेची दान देगा देवा... आता सर्वांचे घसे कोरडे पडले तरी पाऊस पडू दे, काळ्या मातीला हिरव्या पिसाऱ्याने झाकून टाक, पिकांच्या राशी खळ्यात पडू दे अन् आमच्या पदरात स्वस्ताई अन् पोटभर भाकरीचे दान टाक’ म्हणत विठुरायाचे पाय धरून त्याला साकडेच घातले.
विठू माउली तू माउली जगाची... तुजविण कोण आम्हा तारी... विठ्ठला माय बापा अशा शब्दांत सर्व भाविक पांडुरंगाच्या देखण्या रूपाकडे बघत त्याला आळवत होते. शहरातील बहुतेक विठ्ठल मंदिरांमध्ये भक्तांच्या चेहऱ्यावर हेच भाव दिसून आले. जिथे तू उभा हात ठेवून कटीवर, तेच आमचे पंढरपूर... असा भजनांचा प्रत्येक मंदिरांमध्ये गजर झाला.

सकाळी वाजतापासून ते रात्री उशिरापर्यंत भक्तांनी विठुरायाचे दर्शन घेतले. शहरातील सर्वात पुरातन अंबापेठ येथील मंदिरात तर सकाळपासूनच दर्शनासाठी भक्तांची गर्दी झाली होती. सर्वांनी रांगेत माउलीच्या पायावर डोके ठेवले. सर्वत्र उत्साह आणि चैतन्याचे वातावरण होते. दर्शन केल्याशिवाय फराळही करायचा नाही, असे ठरवून आल्यामुळे अनेक जण जरा लगबग करताना दिसले. यंदा या मंदिराचा गाभारा सजवण्यात आल्याने पांडुरंगाच्या गळ्यात तुळशीच्या माळा, पितांबर, कपाळी गंध आणि मुकुट असे देखणे रूप सर्वच डोळे भरून बघत होते. मंदिरात आणि मंदिराबाहेर गर्दीमुळे परिसराला यात्रेचे स्वरुप आले. सजलेली फुले, प्रसाद हारांची दुकाने, फराळाचे पदार्थ, फेरीवाले असे सर्वच या आषाढीचा आपापल्यापरीने फायदा करून घेण्यासाठी परिश्रम घेत होते. अंबागेट, रेल्वे स्टेशन, केडियानगर या भागातील मंदिरांमध्ये भाविकांना उपवास असल्यामुळे फळे, साखर शेंगदाणे, गूळ दाण्याच्या वड्या, भाजलेले शेंगदाणे, चिरंजी, रेवड्या, खोबरे आणि बत्ताशांचा प्रसाद वाटण्यात आला.

विठ्ठलमंदिर संस्थानात महोत्सव : आषाढीएकादशीनिमित्त अंबागेट येथील विठ्ठल मंदिर संस्थानात सुमारे महिनाभर महोत्सव साजरा करण्यात आला. सुरुवात जुलैपासून झाली. यादरम्यान महाभिषेक, पूजा, महाआरती, प्रसाद वितरण, वारकरी महिला मंडळांचे हरिपाठ भजन, सत्कार समारंभ आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

अंबागेट येथील मंदिरात नयनरम्य गाभाऱ्याचे करण्यात आले लोकार्पण
अंबागेटयेथील पुरातन जागृत विठ्ठल मंदिराच्या नवनिर्मित देखण्या गाभाऱ्याचे आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर लोकार्पण करण्यात आले. वास्तुशिल्पकार सुशील खंडारकर यांच्या मार्गदर्शनाखाली गाभारा अप्रतिमपणे सजवण्यात आला. या सोहळ्याला वर्धा येथील खासदार रामदास तडस, अमरावतीचे आमदार डाॅ. सुनील देशमुख, माजी महापौर िमलिंद चिमोटे, संस्थानचे अध्यक्ष शंकर हिंगासपुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. याप्रसंगी संस्थानचे पदाधिकारी मधुकर डाफे, नागो पिंपळे, अशोक गुल्हाने, मनोहर गुल्हाने, अविनाश गुल्हाने, दिगांबरपंत जिरापुरे, शिवाजी शिरभाते इतर उपस्थित होते.

तुळशीमाळांची मागणी वाढली: विठ्ठलालातुळशी फारच प्रिय असल्यामुळे प्रत्येक मंिदरापुढे तुळशीच्या माळांची दुकाने सजली होती. १० रुपयांपासून ते ५० रुपयांपर्यंच्या लहान मोठ्या माळा उपलब्ध होत्या. काही केवळ तुळशीची पानं चरणावर वाहूनच समाधान मानत होते.
एकादशीचे पौराणिक महत्त्व : पूर्वीदेव आणि दानवांचे युद्ध झाले. कुंभदैत्याचा पुत्र मृदुमान्य याने तप करून शंकराकडून अमरत्व िमळवले. त्यामुळे तो त्रिदेवांविरुद्ध अजिंक्य ठरला. त्याच्या भयाने देव चित्रकूट पर्वतावर धात्रीच्या वृक्षतळाला गुहेत दडून बसले. त्यांना आषाढ एकादशीचा उपवास घडला. तसेच पर्जन्य धारेत स्नानही घडले. अकस्मात त्यांच्या एकवटलेल्या श्वासापासून एक शक्ती उत्पन्न झाली. त्या शक्तीने गुहेच्या दाराशी बसलेल्या मृदुमान्य दैत्याला ठार केले. ही जी शक्तीदेवतेची एकादशी देवता आहे.

फराळासाठी हाॅटेलमध्ये गर्दी : आषाढीएकादशीला फराळाचे पदार्थ, पेढे खरेदी करण्यासाठीही हाॅटेलमध्ये गर्दी िदसून आली. फराळी चिवडा, शिंगाड्याचे शेव, साबुदाण्याचे वडे, बटाट्याचे वडे खरेदी करण्याकडे बहुतेकांचा कल होता. पेढे मिठाई खरेदी करण्यासाठी गर्दी झाली होती.
अंबापेठेत सजला गाभारा : अंबापेठमधीलमंिदरात फुलांनी गाभारा सजवण्यात आला होता. काच, दीप आणि कलाकुसरीद्वारे गाभारा तयार केला आहे. दर्शनासाठी येण्याचा जाण्याचा मार्ग सुरक्षित असल्याने भाविकांना दर्शन घेणे सोयीचे झाले. अतिथींच्या दर्शनासाठी वेगळी सोय केल्याने सामान्यांच्या दर्शनाला अडथळा झाला नाही.

बेल, फुलांची मोठी विक्री
अंबापेठेतील मंिदरात उत्साह, चैतन्याचे वातावरण
अमरावतीतील अंबागेट परिसरातील विठ्ठल रुक्मीणी मंदिरात भाविकांनी दर्शन घेतले.