आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वंचित घटकातील बालकांना नर्सरीपासून प्रवेशाचा मार्ग खुला!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - जिल्ह्यातीलनामांकित शाळांमध्ये वंचित घटकातील बालकांना २५ टक्के आरक्षणातून नर्सरीपासूनच प्रवेश मिळेल २५ टक्के आरक्षणातून नर्सरी प्रवेशबंदीवरील स्थगनादेश मुंबई उच्च न्यायालयाकडून हटवण्यात आला. नर्सरी १,१६५, तर पहिली २,४४२ अशा एकूण ३,६०७ जागांवर वंचित घटकातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे.
महापालिका क्षेत्रासह जिल्ह्यात २१७ इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळा असून, येथील प्रवेशासाठी ऑनलाइन सोडत एप्रिल १५ ला काढण्यात आली. १,६०१ बालकांचे नर्सरी वर्ग एकमधील प्रवेश ऑनलाइन सोडतीमधून निश्चित करण्यात आले होते. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने २५ टक्के आरक्षणाच्या प्रवेशाला ब्रेक लागला होता. खासगी शिक्षण संस्थाचालकांचा नर्सरीपासून प्रवेश देण्यास विरोध होता. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता नर्सरीपासून २५ टक्के आरक्षणातून प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा केला आहे. शासन निर्णयाविरोधात याचिका दाखल केल्या होत्या. मे जूनमध्ये या प्रकरणात सुनावणी करत जुलै १५ रोजी उच्च न्यायालयाने शासन आदेशाला स्थगिती दिली. ३० एप्रिल १५ पूर्वीच्या धोरणानुसार नर्सरीत प्रवेश करण्याबाबतदेखील उच्च न्यायालयाकडून स्पष्ट केले आहे.
दुसरा टप्पा लवकरच
२५टक्के आरक्षण प्रवेशाबाबत उच्च न्यायालयाने आदेश दिल्याने २२ जुलैपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. जिल्ह्यातून ३,४६९ अर्ज प्राप्त झाले, पहिल्या फेरीत १,६०१ अर्जच प्रवेशासाठी पात्र ठरले, तर १,८०० च्या जवळपास अर्ज प्रवेशासाठी शिल्लक आहे. नर्सरी वर्ग एक मिळून ३,६०७ जागा आहेत. १,६०१ प्रवेश निश्चित होणार असल्याने दोन हजार जागांसाठी दुसरी सोडत काढली जाणार आहे.
1,165
वर्ग एक
2,442
नर्सरी
1,601
490
1,313
3,469
प्रवेश पात्र अर्ज
प्रलंबित अर्ज
सोडतीत पात्र अर्ज
एकूण प्राप्त अर्ज
जिल्ह्यातील एकूण शाळा २१७ (शहर ८१, ग्रामीण १८७)
अशी आहे स्थिती
¾ नर्सरीपहिली मिळून २५ टक्के आरक्षणाच्या ३,६०७ जागा
बातम्या आणखी आहेत...