आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आडनदीजवळ आढळला वृद्ध आई, मुलाचा मृतदेह, काही दिवसांपासून होते बेपत्ता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परतवाडा- मागीलकाही दिवसांपासून घरुन बेपत्ता असलेल्या वृद्ध आई मुलाचा मृतदेह परतवाडा ते चिखलदरा मार्गावरील आडनदीजवळ मंगळवारी (दि. १७) आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. महिलेचा मृतदेह अर्धवट जळलेल्या अवस्थेत तर पुरूषाचा मृतदेह कुजला होता. सुमित्रा लालाजी नागले (७५) आणि ऋषी लालाजी नागले (५५ दोघेही रा. कविठा, ता. अचलपूर) अशी मृतकांची नावे आहेत.
मंगळवारी दुपारच्या वेळी चिखलदरा मार्गावरील आडनदी जवळ वनविभागाच्या कर्मचाऱ्याला गस्ती दरम्यान एक मृतदेह दिसला. पुढे आणखी एक मृतदेह होता. एकाचवेळी दोन मृतदेह मिळून आले. त्यातही एक मृतदेह कुजलेला दुसरा अर्धवट जळालेला. यातही महिला पुरूषाचा मृतदेह असल्यामुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच चिखलदराचे ठाणेदार नितीन गवारे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेहाची पाहणी केली असता दोन्ही मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होते. त्यामुळे घटनास्थळावरच शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेऊन वैद्यकिय तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. त्याच ठिकाणी दोन्ही मृतदेहाचे विच्छेन पार पडले. मात्र तोपर्यंत ओळख पटली नव्हती. दरम्यान सायंकाळच्या सुमारास ऋषी नागले यांचा मुलगा मुलगी हे घटनास्थळी पोहचले. हे मृतदेह ज्या ठिकाणी पडले होते, त्याच्या आजूबाजूला काही कपडे पाण्याची बॉटल होती. तसेच मृतकाच्या हातावर गोंदलेले होते. यावरून मुलांनी आपल्या वडिलाला आजीला ओळखले. हे दोघेही मागील काही दिवसांपासून घरातून बेपत्ता होते.
या प्रकरणी आठ दिवसांपूर्वी परतवाडा पोलिसांत हरविल्याबाबत तक्रार देण्यात आली असल्याचे चिखलदरा पोलिसांनी सांगितले.
अशी मृतकांची नावे आहेत.
मंगळवारी दुपारच्या वेळी चिखलदरा मार्गावरील आडनदी जवळ वनविभागाच्या कर्मचाऱ्याला गस्ती दरम्यान एक मृतदेह दिसला.

दोघांचीही ओळख पटली
चिखलदरामार्गावरील आडनदी जवळ दोन अनोळखी मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मिळाले होते. मंगळवारी सांयकाळी नातेवाईकांनी दोन्ही मृतदेहाची ओळख पटवली असून मृतक हे आई मुलगा असल्याचे सांगितले आहे. त्यांच्या हरविल्याबाबत परतवाडा पेालिसात तक्रारसुध्दा दाखल होती. घटना कशी घडली, मृत्यू कश्यामुळे झाला, याबाबत तपास सुरू आहे. नितीनगवारे,