आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकाच दिवशी झाल्या सात ठिकाणी चोऱ्या, साडेतीन लाखांचा माल लंपास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- मागीलदोन महिन्यांपासून शहरात चोरट्यांनी चोरीचा धडाका लावला असून, चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात शहर पोलिसांना अद्याप यश आले नाही. त्यामुळे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत दरदिवशी सरासरी ते चोरीच्या घटना घडत आहेत. सोमवार, डिसेंबर रोजी आयुक्तालयाच्या हद्दीतील पाच पोलिस ठाण्यांमध्ये सात चोऱ्या घडल्या असून, यामध्ये चोरट्यांनी लाख ४९ हजार २०० रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.
बडनेरा बसस्थानकावर ७८ हजारांचा ऐवज लंपास झाल्याची तक्रार सोमवारी महिलेने बडनेरा ठाण्यात दिली आहे. तसेच रविवारी रात्री बडनेराजवळील साहील लॉनमध्ये एका व्यक्तीची २५ हजार रुपये किमतीची दुचाकी चोरीला गेली. फ्रेजरपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राहुलनगरमधून उत्तम व्यंकटराव खंडारे यांची दुचाकी चोरट्यांनी लंपास केली आहे. तसेच राजापेठ परिसरातील सबनिस प्लॉटमध्ये एका खासगी रुग्णालयाचे बांधकाम सुरू आहे.
तेथे इलेक्ट्रिक फिटिंगसाठी आणलेले इलेक्ट्रिक वायरचे सहा बंडल (किंमत हजार २०० रुपये) चोरट्याने लंपास केले. याप्रकरणी बालकिसन देवीलाल काकाणी यांनी राजापेठ पोलिसात तक्रार दिली आहे. तसेच कोतवाली पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील एका महिलेच्या घरातून चोरट्यांनी हजार रुपयांचे लोखंडी साहित्य चोरले. तर डिसेंबरला रुचित दिलीप कोराट यांच्या घरातून चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांसह ७५ हजारांची रोख, असा एकूण लाख २३ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. तसेच वलगाव ठाण्याच्या हद्दीतील खारतळेगाव शिवारातील सुभाष उपरकर यांच्या शेतातील डीपीमधून अॅल्युमिनिअम प्लेट्स आणि ऑइल, असे एकूण ९० हजारांचे साहित्य लंपास केले आहे.
बातम्या आणखी आहेत...