आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरदिवसा होतोय गुटख्याचा पुरवठा, प्रशासनाची ना कुणावर ‘नजर’ ना कुणी ‘तलब’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परतवाडा- आरोग्यासहानिकारक असल्यामुळे राज्यात गुटखाबंदी असताना तालुक्यात सर्रास अवैध गुटखा विक्री सुरू आहे. परंतु, त्यावरही कळस म्हणजे सध्या गुटखा विक्रेत्या कंपन्यांनी या जीवघेण्या वस्तूची विक्री वाढवण्यासाठी विक्रेत्यांना लाखोंची बक्षिसे देऊ केली आहे. या खुलेआम विक्रीबाबत अन्न औषध प्रशासनाची ‘नजर’ मेल्याने गुटख्याचे अवैध विक्रेते ‘तलब’ होऊ शकत नसल्याचे जागरूक नागरिकांचे म्हणणे आहे.
तंबाखूजन्य पदार्थ गुटखा आरोग्यास हानिकारक असल्यामुळे त्यापासून कर्करोगासारखे गंभीर आजार होतात. या पदार्थांचे सेवन करणाऱ्याला सावधानतेचा इशाराही गुटखा तंबाखूच्या पुड्यांवर नमूद केले जाते. तरुण पिढी नागरिक यापासून होणाऱ्या जीवघेण्या आजारापासून वाचावे यासाठी शासनाने यावर बंदीही घातली आहे. तरीही तालुक्यासह जिल्ह्यात सर्रास गुटखा विक्री सुरू आहे. लोकशाही आघाडीच्या कार्यकाळात नागरिक कर्करोगासारख्या जीवघेण्या आजाराला बळी पडू नये म्हणून गुटखा, सुगंधित तंबाखू, खर्रा आदी वस्तूंवर कायद्याने बंदी आणली होती. परंतु, त्यानंतरही तालुक्यासह राज्यात सर्रास गुटखा विक्री सुरू आहे. पण, त्यावरही कळस म्हणजे दोन गुटखा विक्रेत्या कंपन्यांमध्ये जाहिरातीची जीवघेणी
अधिकाऱ्यांना दिली जाते लाखोंची भेट?
अमरावतीयेथील गुटखा व्यावसायिक अधिकाऱ्यांना गुटखा विक्रीसाठी लाखो रुपये भेट देत असल्यामुळे जिल्ह्यात सर्रास खुलेआम विक्री सुरू असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. त्यामुळेच प्रशासन कारवाई करीत नसल्याचेही बोलले जात आहे.

अचलपूर मुख्य केंद्र : अमरावतीजिल्ह्यातील अचलपूर शहर गुटखा विक्रीचे मुख्य केंद्र असून, अमरावती येथील बड्या व्यापाऱ्याकडून हा गुटखा पाठवला जात असल्याची विश्वसनीय माहिती आहे. परंतु, अमरावती शहरातच मुख्य कार्यालय असलेल्या अन्न औषध विभागाच्या अधिकाऱ्यांना हे दिसत नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जाते आहे.

बोलेरोतून येतो गुटखा : अमरावतीयेथून बोलेरो पीकअप या वाहनातून दिवसभरात सात ते आठ फेऱ्यांमध्ये पाचशे पोती गुटखा शहरात येतो.त्याचे दुचाकी आटोने तालुक्याच्या विविध भागांत वितरण केले जाते. मध्य प्रदेशातूनही खासगी बसमधून गुटखा आणला जातो.अनेक गॅरेज व्यावसायिकांच्या माध्यमातून हा गुटखा विक्रेत्यांकडे पोहोचवला जातो.

अशी आहेत बक्षिसे
एकपाकीट रेनकोट
६०० पाकिटे सहा खुर्च्या
९०० पाकिटे मोबाइल
१५०० पाकिटे सायकल
३३०० पाकिटे वाशिंग मशीन
४५०० पाकिटे रेफ्रीजरेटर
६००० पाकिटे २२ इंची एलईडी टीव्ही
À७५०० पाकिटे ३२ इंची एलईडी टीव्ही
१५,००० पाकिटे एसी
२५,००० पाकिटे मोटारसायकल
३६,००० पाकिटे मोपेड मोटारसायकल
९०,००० पाकिटे मोटारसायकल

गुटखा विक्री वाढवण्यासाठी तालुक्यातील विक्रेत्यांना कंपन्यांकडून असे जाहिरातींचे फलक वाटले जात आहेत.

ही सामाजिक हानी
गुटख्यामुळेदेशाचे भावी आधारस्तंभ असलेल्या तरुण पिढीचे आरोग्य धोक्यात आले आहे. यामुळे व्यसनाधीनता मोठ्या प्रमाणात वाढत असून, युवा िपढी गारद होत आहे.ही मोठी सामाजिक हानी आहे. प्रा.डॉ. नीलेश तारे, परतवाडा.

जाणीवपूर्वक दुर्लक्ष
पोलिसअन्न, औषधी प्रशासन विभागाने गुटखा विक्रीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे सर्रास विक्री सुरू आहे. प्रत्येक चौकात पुड्या मिळतात. हे ना पोलिसांना दिसते, ना संबंधित विभागाला. रुपेशढेपे, जिल्हा नियोजन समिती सदस्य.