आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लखपती करणाऱ्या संत्रीने या वर्षी केले दिवाळखोर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - कमालीचे बदलते वातावरण, संत्रा पिकाला नसलेले शासकीय संरक्षण यांसह विविध कारणांमुळे बाजारात प्रथमच संत्रा बेचव झाला आहे. त्यामुळे कधी काळी शेतकऱ्यांना लखपती करणारा संत्रा या वर्षी उत्पादकांना दिवाळखोर करणारा ठरत आहे. दरम्यान, दोन दशकांपूर्वी ‘कोळशी’मुळे संत्रा बागा तोडल्यानंतर पुन्हा संत्र्याच्या बेभावामुळे या बागा तोडणीचा विचार शेतकरी करू लागला आहे. यंदा झालेल्या संत्र्याच्या अधोगतीमुळे शेतकऱ्यांसह व्यापारीही कमालीच्या अडचणीत आल्याने खरेदीच बंद झाली आहे.
जिल्ह्यात एकूण फळपिकांपैकी संत्र्याचे क्षेत्र सर्वाधिक ८० टक्के इतके आहे. सर्वाधिक संत्रा बागा अचलपूर, चांदूरबाजार, वरुड, मोर्शी, अंजनगावसुर्जी, चांदूर रेल्वे, तिवसा, धामणगाव रेल्वे आदी तालुक्यांमध्ये आहेत. बागायत पट्ट्यात दोन वर्षांपूर्वी संत्र्याचे पीक शेतकऱ्यांची दशा पालटणारे ठरले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात संत्रा बागांची लागवड करण्यात आली. लग्नातही संत्र्याची बाग मुलाच्या घरी असल्यास डोळे मिटून मुलगी दिली जात होती. परंतु, मागील वर्षापासून बदलते वातावरण, संत्र्याला नसलेले शासकीय संरक्षण यामुळे संत्र्याची साडेसाती सुरू झाल्याचे चित्र जिल्ह्यात निर्माण झाले आहे.

नगदी पीक असल्यामुळे दोन दशकांत चांदूर बाजार, अचलपूर, मोर्शी, अंजनगावसुर्जी, वरुड, मोर्शी या प्रमुख तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी जमिनी संत्र्याच्या बागांखाली आणल्या. त्यामुळे इतर पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे जमिनीच शिल्लक नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दरम्यान, मागील वर्षापासून संत्र्याला जबर फटका बसत असल्यामुळे बागांवर केलेला खर्चही निघणे कठीण झाले आहे. त्यामुळे कधी काळी शेतकऱ्यांना संपन्न करणाऱ्या या बागांनी या वर्षी संत्रा उत्पादकांना दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभे केले आहे. दोन दशकांपूर्वी संत्र्यांवर मोठ्या प्रमाणात कोळशीचा प्रादुर्भाव झाला होता. यात शेतकऱ्यांनी हजारो हेक्टरवरील बागा तोडून टाकल्या होत्या. त्यानंतर पर्यायी उत्पन्नाचे स्रोत तयार करण्यासाठी व्यवस्था प्रथमच या वर्षी बागा तोडून टाकण्याचा विचार शेतकरी करू लागला आहे.

...तरबागा नेस्तनाबूद : मागीलवर्षापासून सुरू झालेली संत्र्याची साडेसाती पुढील दोन वर्षे कायम राहिल्यास उपजीविकेसाठी शेतकऱ्यांना बागा तोडाव्या लागणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. सध्या बऱ्याच शेतकऱ्यांनी संपूर्ण शेतजमीन संत्र्याखाली आणल्यामुळे जगण्यासाठी पर्यायी पीक घेण्याची सुविधा शेतकऱ्यांकडे नाही.

लाखाची बाग दहा हजारांत विकण्यास तयार
माझ्या बागेत सध्या एक ते दीड लाख रुपयांची संत्री आहेत. परंतु, बाग विकत घेण्यासाठी व्यापारीच येत नसल्यामुळे मोठी कोंडी झाली आहे. सध्या मी लाख रुपयांची बाग दहा हजार रुपयांतही विकण्यास तयार आहे. -श्याम खाळगडे, शेतकरी

तोडणीचा खर्च केला खिशातून
रोग प्रतिकूल वातावरणामुळे या वर्षी संत्रा बेचव झाला आहे. त्यामुळे भाव नाहीच. परंतु, त्याला लागणारा खर्चही वसूल होत नाही, अशी परिस्थिती मागील तीस वर्षांपासून मी पाहिली नाही. यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. एवढेच नाही तर मी स्वत: माझ्या शेतातील संत्रा तोडून फेकला. यासाठी आलेला खर्च मला खिशातून करावा लागला.

वातावरणातील बदलाने संत्रा बेचव
वातावरणातील बदलामुळे संत्र्याला असणारी विशिष्ट चव या वर्षी नाही. विविध रोगांचेही संत्र्यावर आक्रमण झाले आहे. त्यामुळे बाजारपेठेत मागणी कमी असल्यामुळे बेभाव संत्रा विकावा लागत आहे. आंिबया बहाराच्या तुलनेत मृग बहाराच्या संत्र्याला चांगली चव असते. वातावरणातील बदलामुळे चांगल्या दर्जाची फळे गळून पडली आहेत. उरलेल्या फळांना चवच नाही.

‘घोड्यापेक्षा नाल महाग’ अशी स्थिती
मागील चाळीस वर्षांत कधी नव्हे, अशी परिस्थिती या वर्षी उद््भवली आहे. या वर्षी संत्र्याला भाव तर नाही उलट विकत घेतलेल्या बागांचे पैसेही वसूल होत नाहीत.संत्र्याचा भाव रुपये प्रती किलो, सरासरी पॅकिंगचा खर्च रुपये वाहतुकीचा खर्च १२ रुपये, असा सरासरी १८ ते २० रुपये सध्या खर्च येत आहे. परंतु, परप्रांतात हा संत्रा १४ ते १६ रुपये किलोने विकावा लागत आहे.

फळ गळती कायम
वातावरणात अद्यापही थंडी पडल्याने संत्र्याची फळगळती मोठ्या प्रमाणात सुरू आहे. चांगल्या दर्जाची फळे गळून पडत असल्यामुळे केवळ बाजारात भाव नसलेली फळे आता झाडांवर उरली आहेत. बाजारात भावच नसल्यामुळे शेतकऱ्यांनी फवारणीच्या खर्चासाठीही हात आखडता घेतल्याचे चित्र सध्या जिल्ह्यातील संत्रा उत्पादक भागात पहावयास मिळत आहे.

ठोक बाजारात संत्रा ते रुपये किलो : जिल्ह्यातूनदिल्ली, जयपूर, गाझियाबाद, फरिदाबाद, बंगळुरू आदी प्रमुख शहरातील बाजारपेठेत संत्रा स्थानिक व्यापाऱ्यांकडून पाठवला जातो. या बाजारपेठेतच संत्र्याचे भाव सरासरी ते रुपये प्रती किलो आहे.