आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संत्रा महोत्सव ठरणार शेतकऱ्यांना लाभदायी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - अमरावती जिल्ह्यातील वरुड येथे होणारा कृषि आणि संत्रा महोत्सव शेतकऱ्यांना प्रेरणा देणारा ठरेल असा विश्वास जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी व्यक्त केला आहे. येत्या ते ऑक्टोबर दरम्यान वरूड येथे हा संत्रा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर गिते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयात बोलताना गिते पुढे म्हणाले की, अमरावती जिल्हा हा समृध्द जिल्हा आहे. आगळावेगळा आहे. अमरावती जिल्ह्यातील शेतकरी प्रामुख्याने शेतीवरच अवलंबून आहेत. या जिल्ह्यात जोडधंदा म्हणून पशुसंवर्धन हे पाच टक्क्यापेक्षाही कमी आहे. या भागात फळप्रक्रिया उद्योग नाहीत. फळ प्रक्रिया उद्योग जर विकसित करावयाचा असेल तर कमी एक लाख हेक्टरच्या आपणास हे क्षेत्र आपणास न्यावे लागेल. तर फळ प्रक्रिया उद्योग टिकाव धरु शकेल. असे गिते यांच म्हणणे आहे. महाराष्ट्रातील १० लाख हेक्टर क्षेत्र हे उसासाठी वापरण्यात येते. यातील आठ लाख हेक्टर क्षेत्र हे एकट्या पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा (पश्चिम महाराष्ट्राला लागून असलेले जिल्हे उदा. लातूर, उस्मानाबाद, बीड) येथे वापरण्यात येते. उर्वरित महाराष्ट्रात फक्त दोन लाख हेक्टर क्षेत्र या पिकासाठी वापरले जाते. पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत हे बरेच कमी आहे, असे गिते म्हणाले.
अमरावती जिल्ह्यामध्ये लाख हेक्टर जमीन पेरणीयोग्य आहे. या जिल्ह्यात नागरी, ग्रामीण आदिवासी भागाचा समावेश आहे. या तिन्ही बाबींचा संगम येथे झालेला आहे. शिवाय हा जिल्हा भौगोलिकदृष्ट्या देखील संपन्न आहे. सातपुडा पर्वताच्या रांगा याच जिल्ह्यात आहे. शिवाय निसर्गाची कृपाही या जिल्ह्यावर भरपूर आहे. अमरावती जिल्ह्यात सात लाख हेक्टर जमीन पेरणीयोग्य आहे. ९५ टक्के लोक या जिल्ह्यात खरिपांची पिके घेतात. फक्त टक्के लोक रब्बीची पीक घेतात. खरीप पिकाच्या तुलनेत रब्बी पीक घेण्याचा लोकांचा कल, शेतकऱ्यांचा दृष्टीकोन फारच कमी आहे. या जिल्ह्यात अगोदर कापसाचं पारंपारिक पिक घेतलं जात होतं आता हे समीकरण बदलले आहे. शेतकरी सोयाबीन उत्पादन करण्याकडे वळले आहेत. जिल्ह्यातील ४९ टक्के जमीन ही सोयाबीन उत्पादनासाठी वापरली जाते. पण तरीही सोयाबीन पासून मिळणारे उत्पन्न हे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास अपुरे ठरत आहे, असे किरण गिते यांनी यावेळी सांगितले.

दुबार पीक हा महत्त्वाचा मंत्र
अमरावती जिल्ह्यात रब्बी पिकासाठी फक्त टक्के जमिनीचा वापर होतो. हे प्रमाण फारच अत्यल्प आहे. आपल्या अमरावती जिल्ह्यात पाऊस बरा पडतो. शिवाय तो उशिरापर्यंत येत असतो. आपली जमिनीची प्रत उत्तम आहे. पाण्याची पातळी चांगली आहे. सिंचनाच्या सोयी आहेत. रब्बी पिकाचं क्षेत्र हे जर आपणास ५० टक्क्यापर्यंत वाढविता आले. दोन पिके घेण्याची मानसिकता विकसित करता आली. तीन-चार लाख हेक्टरपर्यंत ही मजल गेली तर ह्या भागातील शेतकरी चांगल्या रितीने समृध्द होऊ शकतो. दुबार पिक हा महत्वाचा मंत्र अमलात आणण्याची गरज आहे.

जलसंपदेच्या बाबतीत आजही जिल्हा समृद्ध
अमरावती जिल्ह्याला पाण्याच्या बाबतीत समाधानी जिल्हा म्हणावा लागेल. अप्पर वर्धा, शहानूर, चंद्रभागा, पूर्णा, सापन प्रकल्प आजही त्यांच्यातील प्रचंड जलसंपदेमुळे जिल्ह्यात पुरेसे पाणी देत आहेत. यावर्षी देखील अप्पर वर्धा धरणाचे तेराही दरवाजे उघडावे लागले असे असतानाही या धरणात ९९ टक्के पाणी आहे. शहानूर प्रकल्पही ८८ टक्के भरलेला आहे. चंद्रभागा प्रकल्पातही ८१ टक्के जलसाठा आहे. पूर्णा प्रकल्पात ९६ टक्के तर सापन प्रकल्पात ८४ टक्के एवढा प्रचंड जलसाठा आहे. इतर जिल्ह्याच्या तुलनेत जलसंपदेच्या बाबतीत आजही हा जिल्हा समृध्द आहे.