आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अन्यथा शेतकऱ्यांच्या नशिबी येणार संत्र्याची'फोतरं'च!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - राज्यात उसावर प्रक्रिया उद्योग उभारून बहरलेल्या सहकारी कारखानदारीमुळे भांडवलदारांच्याच तोंडात साखरेचा गोडवा वाढला आहे. त्यामुळे दरवर्षी पोटाचे चिपाड झालेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना भावासाठी उसाचा धोंडा करावाच लागत आहे. जिल्ह्यातील संत्रा उत्पादकांना चांगले दिवस येण्यासाठी संत्र्यांवर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगासह थेट विक्रेत्यापर्यंत माल पोहोचवण्यासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
संत्रा उद्योगाची रचना साखर कारखानदारीसारखी झाल्यास सहकारी संत्रा उद्योजकांच्या घशातच नफ्याचा रस जाऊन शेतकऱ्यांच्या नशिबी केवळ "फतरं'च येणार आहे. त्यामुळे नफ्याचा गोडवा संत्रा उत्पादकांच्या तोंडात कसा जाईल यासाठी प्रयत्न आवश्यक बाजारपेठ संरक्षण उपलब्ध करून देण्याची गरज असल्याची भावना शेतकरी तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एक ऑक्टोबरला वरूड तालुक्यात संत्रा महोत्सवाच्या उद्घाटनासाठी येत आहेत. जिल्ह्यात प्रक्रिया उद्योग उभे करण्याचे शासनाचे धोरण आहे.