आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओव्हरलोड वाळूचे ट्रक पकडले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्षमतेपेक्षा अधिक वाळूची वाहतूक करणारे ट्रक पोलिसांनी जप्त केले आहेत. - Divya Marathi
क्षमतेपेक्षा अधिक वाळूची वाहतूक करणारे ट्रक पोलिसांनी जप्त केले आहेत.
परतवाडा- ओव्हरलोड वाळूच्या ट्रकमुळे रस्त्याची वाट लागल्याने कांडली येथील संतप्त गावकऱ्यांनी चार वाळूचे ट्रक पकडून ही वाहतूक बंद करण्याची मागणी केली. दरम्यान, महसूल विभागाने चारही ट्रक ताब्यात घेतले अाहे. ही कारवाई बुधवारी (दि. ८) सायंकाळच्या सुमारास करण्यात आली.
करजगाव येथे सध्या धरणाचे बांधकाम सुरू आहे. यासाठी भातकुली तालुक्यातून वाळू आणली जात आहे. या ट्रकमधून एक ब्रास वाळूची वाहतूक करण्याचा परवाना महसूल विभागाने कंत्राटदाराला दिला आहे. परंतु प्रत्यक्षात या ट्रक मधून सर्रास अतिरिक्त दोन ब्रास वाळूची वाहतूक केली जात आहे. त्यामुळे कांडली गावातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून, नालीवरील रपटे फुटले आहेत. त्यामुळे बुधवारी कांडलीचे माजी उपसरंपच राजू कळमकर, भारत थोरात यांच्या नेतृत्वात गावकऱ्यांनी वाळूचे चार ट्रक अडवले.ही वाळू करजगाव येथे राज प्रमोटर्स या कंत्राटदाराकडे पोहचवली जात होती. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार मनोज लोणारकर, तलाठी कावलकर झाकर्डे यांनी घटनास्थळावर धाव घेऊन चारही ट्रकचा पंचनामा केला. यात उमाबेल चव्हाण यांच्या मालकीचा (ट्रक क्रमांक एमएच ०४-४१९८), सादिक भाई (एमएच ३४ ए-४०००), रघुनाथ लोखंडे (एमएच २७ एक्स ३९१४ ) अमित चांडक (एमएच २७ सी ३५३ ) यांच्या ट्रकचा समावेश आहे.
क्षमतेपेक्षा अधिक वाळूची वाहतूक करणारे ट्रक पोलिसांनी जप्त केले आहेत.
बातम्या आणखी आहेत...