आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोसतो दुष्काळाच्या झळा, तरीही करतो उतराईसाठी पोळा!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- जिल्ह्यातअल्प पाऊस, किडींच्या प्रादुर्भावामुळे हातात उत्पादन येण्याच्या दुष्काळी सावटात उद्या (दि. १२) पोळ्याचा सण साजरा होणार आहे. धन्याच्या दारात बरकत यावी म्हणून वर्षभर राबराब राबणाऱ्या सर्जाराजाच्या कष्टाची उतराई करण्यासाठी फाटक्या खिशाचा धनी सज्ज झाला आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे बैलांचा साज-साहित्यांच्या बाजारपेठेवर कमालीचा परिणाम या वर्षी दिसून येत आहे.

वर्षभर धन्याच्या शेतात राबराब राबून त्याची सेवा करणाऱ्या बैलांच्या कर्जाची परतफेड म्हणून उत्साहात पोळा सण साजरा करण्यात येतो. 'खालमान'च्या दिवशी बैलाच्या खांद्याला लोणी हळदीचा लेप लावून त्याला पूर्णपणे आराम दिल्या जाते. उद्या सकाळी स्वच्छ अंघोळ करून ठोमरा पुरणपोळीचा नैवद्य दाखवला जातो. सायंकाळी बैलांचा साज करून त्यांना मारुतीच्या पारावर नेल्या जाते. पूजाअर्चा करून ही बैलजोडी पुन्हा घरी आणल्या जाते. शेतकऱ्याची गृहलक्ष्मी विधिवत बैलांची पूजा करते. परंतु, या वर्षी जिल्ह्यात दुष्काळी स्थिती त्यातच किडीला बळी पडलेल्या पिकांच्या गंभीर परिस्थितीत दुष्काळात तेरावा महिना आला आहे.

व्यवसायाला जबर फटका
यावर्षी पीक परिस्थिती चांगली नसली नसल्यामुळे शेतकऱ्यांची खरेदीसाठी गर्दी नव्हती. त्यामुळे व्यवसायास जबर फटका बसला आहे.'' दयारामवानखडे, साहित्य विक्रेता, चांदूर बाजार.