आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तोतया पोलिसांनी पकडली "असली' पोलिसांची गाडी, बनावटीचा प्रकार आला उघडकीस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- अंगातखाकी पॅन्ट, पायात पोलिसांसारखेच काळे जोडे, तिघे जण रस्त्यांवर उभे तर एक जण अधिकाऱ्याच्या तोऱ्यात काही अंतरावर दुचाकीवर बसलेला. रस्त्याने जाणाऱ्या वाहनांना बेदखलपणे अडवून कागदपत्र, लायसन्सची मागणी करायची आणि ते नसेल तर मनमानी वाट्टेल तेवढ्या रुपयांची वसुली करायची, असा प्रताप चार जणांच्या टोळीने काही दिवसांपासून जिल्ह्यातील काही प्रमुख मार्गांवर सुरू केला होता. मंगळवारी (दि. ८) दुपारी या तोतया वाहतूक पोलिसांना ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने पकडले. तोतयांना पकडण्यात पोलिसांना यश आले, मात्र या घटनेवरून पोलिसांचा वचक संपला की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सूरज बाळू जंवजाळ (२५), संतोष देवराव सरोदे (४६) आणि राहुल रामेश्वर अनासने (२५, तिघेही रा. वाकी रायपूर) अशी गुन्हे शाखेच्या पथकाने पडकलेल्या तोतयांची नावे आहेत. अमरावती -परतवाडा मार्गावरील आसेगावपासून दर्यापूरकडे जाणाऱ्या मार्गावर तीन व्यक्ती उभे होते ते येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना बेदखलपणे थांबवत होते. यावेळी वाहनातून उतरणाऱ्या चालकाला पोलिसी थाटात ते लायसन्स कागदपत्रांची मागणी करत होते. ज्या वाहनाच्या चालकाने कागदपत्र देण्यासाठी असमर्थता दर्शवली त्याला दंडाच्या रुपात पैसे मागायचे. ज्यांनी पैसे दिले ते खिशात ठेवायचे पुन्हा दुसरे वाहन पकडायचे. ज्या वाहनचालकांनी पैसे देण्यासाठी नकार दिला. त्याला हेच तिघे म्हणायचे, बाजूने बसलेले आमचे साहेब आहे, साहेबांना जाऊन भेट. हा साहेब असलेला व्यक्तीसुद्धा त्यांच्याच टोळीमधील एक होता. त्याच्या अंगावर अधिकारी शोभेल असा ऐटबाज पोषाख, अंगात जर्किन, काळा गॉगल होता. त्यामुळे हा व्यक्ती साहेबच आहे, त्यामुळे मग त्याच्याजवळ पैसे द्यायचे. अशा पद्धतीने वाहन चालकांकडून खुलेआम वसुलीचा धंदाच या टोळीने सुरू केला होता. याबाबात दोन दिवसांपूर्वीच स्थानिक गुन्हे शाखेला माहिती िमळाली होती. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक या टोळीच्या शोधात होतेच. दरम्यान मंगळवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे एपीआय नीलेश सुरडकर त्यांच्या पथकासह शासकिय वाहनाने परतवाडा मार्गाने जात होते. त्यांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तातडीने वाहनाच्या खाली उतरून तिघांना पकडले.
याचवेळी एक जण मात्र पसार झाला आहे. त्याचा शोध सुरू आहे. या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आसेगाव पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. त्यांच्याविरुद्ध शासकीय कर्मचारी असल्याचे सांगून पैसे उकळल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. ही कारवाई एपीआय नीलेश सुरडकर यांच्यासह वासुदेव नागलकर, ज्ञानेश्वर सहारे, सुनिल महात्मे, चेतन दुबे, नितीन शेंडे, गणेश मांडवकर यांनी केली आहे.

पोलिसांचाकिती वचक?
हाप्रकार असेगावपासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर सुरू होता.मात्र आसेगाव पेालिसांना या प्रकाराची माहिती नव्हती. गुन्हे शाखेच्या पथकाने जर या ताेतयांना पकडले नसते तर त्यांनी अनेक वाहनचालकांकडून खुलेआम वसुली सुरूच ठेवली असती. घटनास्थळावरील वाहनचालकांच्या सांगण्यावरून मागील तीन ते चार दिवसांपासून ते रस्त्यांवर आहेत. शिवाय स्थानिक गुन्हे शाखेला दोन दिवसांपुर्वी या प्रकाराची माहिती मिळाली होती. मात्र आसेगाव पोलिस म्हणतात, ते आजच हे काम करण्यासाठी आले, त्यामुळे या प्रकरणात संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र आसेगाव पोलिसांच्या हद्दीत किती वचक आहे, हे आजच्या घटनेवरून पुढे आले आहे.या प्रकारामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न चिन्ह लागले आहे.

अरे, यांना तर काल आम्ही पैसे दिले!
पोलिसांनीतोतयांना पकडल्यानंतर दर्यापूर फाट्यावर गर्दी झाली होती. त्यावेळी काही नागरिक वाहनचालकसुद्धा त्या ठिकाणी जमले. काहीजण अरे, यांनी तर काल परवा आमचे वाहन पकडले होते. चांदूर बाजार मार्गावरसुद्धा उभे होते. त्यापैकी एक -दोन वाहनचालक म्हणाले, यांना तर आम्ही पैसेसुद्धा दिले. यावरून या तोतयांनी मागील काही दिवसांपासून हा वसुलीचा धंदा सुरू केला असावा, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या सूत्रांनी दिली.

प्रकरण गंभीर; तपास सुरू
आम्हीपरतवाड्यालानिघालो होतो. रस्त्यात तिघांनी आमचे वाहन अडवले. ते तोतया असल्याची आम्हाला शंका आली.काही वेळानंतर खात्री पटल्याने तिघांना पकडले. प्रकरण गंभीर असून, पुढील तपास आसेगाव पोलिस करीत आहे. नीलेश सुरडकर, एपीआय,स्थानिक गुन्हे शाखा, ग्रामीण पोलिस.

तोतया पोलिसांमध्ये महामंडळाचा वाहक
अटक केलेल्या तोतया वाहतूक पोलिसांपैकी संतोष सरोदे याने एसटी महामंडळात वाहक म्हणून कार्यरत असल्याचे पोलिसांना सांगितले आहे. भंडारा जिल्ह्यातील साकोली आगारात असल्याचेही त्याने सांगितले आहे. त्यामुळेच खाकी कपडे त्यांच्या अंगावर होते. याचवेळी त्याच्या इतर दोन सहकाऱ्यांच्या अंगावरसुद्धा खाकी पॅन्ट होते. या टोळीने अनेक दिवसांपासून वसुलीची मोहीम चालवली असल्याची माहिती पुढे येत आहे.
बातम्या आणखी आहेत...