आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस, आरोग्य कर्मचारीच झाले ‘त्याचे’ नातेवाईक!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- तीनदिवसांपूर्वी एका युवकावर प्राणघातक हल्ला करून हल्लेखाेरांनी त्याला अंबागेट परिसरात मरणासन्न अवस्थेत फेकून दिले हाेते. गंभीर अवस्थेत त्याला पोलिस नागरिकांनी इर्विन रुग्णालयात दाखल केले. प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी जखमी युवकाला नागपूरला हलवण्यास सांगितले. मात्र, हे सर्व करण्यासाठी रुग्णाचे नातेवाईक असणे गरजेचे हाेते. मात्र, त्या जखमी युवकाची ओळखच पटल्याने त्याचे नातेवाईक काेण, याचाही अद्याप शाेध लागलेला नाही. अखेर खोलापुरी गेट पोलिसांनी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनीच त्याचे नातेवाईक बनत या युवकाला उपचारासाठी नागपूरला हलवले.
अंबागेट परिसरात शनिवारी (दि. १८) रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास एक युवक रक्तबंबाळ अवस्थेत पडला होता. ही माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन त्या युवकाला रुग्णालयात दाखल केले. या युवकाच्या डोक्याला गंभीर जखमा असून, त्यामधून रक्तस्त्राव सुरू होता. अज्ञात व्यक्तीने त्याच्या डोक्यावर वार केल्याचे प्रथमदर्शनी पोलिसांना आढळले. मात्र, त्या जखमी युवकाची ओळखच पटल्यामुळे पोलिसांचा तपास पुढे सरकला नाही. दुसरीकडे त्या युवकाची प्रकृती अधिक चिंताजनक असल्यामुळे स्थानिक डॉक्टरांनी त्याला नागपूरला उपचारासाठी पाठवण्याची गरज असल्याचे पोलिसांना सांगितले.

अशा वेळी नागपूरला रुग्ण घेऊन जाण्यासाठी नातेवाईक गरजेचे आहे, मात्र ओळख पटली नसल्यामुळे नातेवाईक कसे येतील. अशा वेळी खोलापुरी गेट पोलिस आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनीच त्या युवकाला नागपूरला घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. अखेर रविवारी दुपारी खोलापुरी गेटचे दोन पोलिस आरोग्य विभागाचे दोन कर्मचारी यांनी त्या युवकाला नागपूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले.

^गंभीर जखमी युवकाची ओळख अजूनही पटली नाही. इर्विनच्या डॉक्टरांनी त्या युवकाला नागपूरला हलवण्यासाठी सांगितले होते, त्यामुळे तातडीने आमचे कर्मचारी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी स्वत: त्याला सोबत नेले, नागपूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. सध्या नागपुरात त्या युवकावर उपचार सुरू आहेत. कुमारआगलावे, ठाणेदार, खोलापुरी गेट, अमरावती.

पोलिस, आरोग्य कर्मचारीच झाले ‘त्याचे’ नातेवाईक!
पोलिसांनी ककर्मचाऱ्यांनी ही माणुसकी दाखवता त्या युवकाच्या नातेवाइकांचा शोध घेण्याची प्रक्रिया केली असती, तर त्यामध्ये खूप वेळ गेला असता. दुसरीकडे युवकाची ओळख पटलेली नाही, त्यामुळे त्याच्यावर हल्ला कोणी केला, कशासाठी केला, असे प्रश्न पोलिसांपुढे आहेत.
बातम्या आणखी आहेत...