आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरातील तीन नवीन ठाण्यांच्या निर्मितीला आला वेग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - नागपूरचे हिवाळी अधिवेशन विदर्भात होत असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भातील सर्व जिल्ह्यांचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला असून, या निर्णयाअंतर्गत शुक्रवार, ११ डिसेंबर रोजी मुख्यमंत्र्यांनी अमरावती जिल्ह्याचा आढावा घेतला. या वेळी शहरात प्रस्तावित तीन पोलिस ठाण्यांच्या विषयासह इतर मुद्द्यांवर मुख्यमंत्र्यांनी बैठकीत माहिती घेतली असून, प्रस्तावित ठाण्यांबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याने शहरातील तीन नवीन ठाण्यांच्या निर्मितीला वेग आला आहे.

आयुक्तालयाच्या हद्दीतील दहा ठाणे असून, राजापेठ आणि गाडगेनगरची हद्द प्रचंड विस्तारली आहे. २०११ मध्येच गृह विभागाकडे शहरात तपोवन, एमआयडीसी आणि साईनगर हे तीन नवीन पोलिस ठाणे प्रस्तावित केले आहे. मात्र, अद्याप शासनाकडून या ठाण्यांना मंजुरात प्राप्त झालेली नाही. दरम्यान, शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत अमरावतीचे आमदार डॉ. सुनील देशमुख यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. त्या वेळी मुख्यमंत्र्यांनी सदर ठाण्यांच्या प्रस्तावाबाबत तातडीने प्रक्रिया करण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच स्मार्ट आणि सेफ सिटी या शीर्षाखाली सीसीटीव्ही लावण्यात येणार आहे. त्यामुळे आगामी काळात शहरात विविध मार्गांवर प्रमुख चौकांमध्ये तब्बल ८३० सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येतील. या कॅमेऱ्यासाठी पोलिस नियत्रंण कक्षात आणि महापालिका किंवा जिल्हाधिकारी कार्यालय, अशी दोन ठिकाणी कंट्रोल रूम राहणार आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त राजकुमार व्हटकर यांनी शनिवारी दिली आहे.

{ कॅमेऱ्यांसाठी पोलिस कंट्रोल रुम,मनपा किंवा जिल्हा कचेरीमध्ये राहणार स्वतंत्र यंत्रणा.
{ प्रमुख चौकांमध्ये लावले जाणार तब्बल ८३० सीसीटीव्ही कॅमेरे.

खोलापुरी गेट ठाण्यासाठी दोन वर्षांपूर्वी साबांविने बांधलेली इमारत पोलिस विभागाकडे हस्तांतरित करावी, यासाठी आयुक्तांनी साबांविला नुकतेच सांगितले आहे. त्यामुळे आगामी आठवडे, दोन आठवड्यांत ही इमारत पोलिस विभागाकडे हस्तांतरित होईल.


बातम्या आणखी आहेत...