आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांच्या मारहाणीमुळेच झाला विजय बुटलेंचा मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विजय लक्ष्मण बुटके - Divya Marathi
विजय लक्ष्मण बुटके
अमरावती- चोरीप्रकरणात यवतमाळ पोलिसांनी अटक केलेल्या युवकाची जुलैला जामिनावर सुटका झाली होती. गुरूवारी (दि. ९) त्या युवकाचा उपचारादरम्यान अमरावतीला मृत्यू झाला. या मृत्यूला यवतमाळ पोलिस जबाबदार असल्याचा आरोप युवकाच्या नातेवाईकांनी केला आहे. यावेळी नातेवाईकांनी यवतमाळ पोलिसांवर रोष व्यक्त केला आहे. विजय लक्ष्मण बुटके (३५ रा. उत्तमसरा, यवतमाळ) असे मृतक युवकाचे नाव आहे.
विजय बुटके दोन दिवसांपासून शहरातील इर्विन रुग्णालयात दाखल होते. प्रकृती खालावल्यामुळे त्यांना गुरूवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास शहरातीलच सुपर स्पेशालीटी रुग्णालयात उपचारासाठी आणले. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. बुटके यांचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळे झाल्याचा आरोप मृत्यूनंतर सुपर स्पेशालीटीमध्ये आलेल्या नातेवाईकांनी केला होता.

विजय बुटके यांना २९ जूनला यवतमाळातील वळगाव पोलिसांनी अटक केली होती. याचवेळी त्याच्या भावाला इतर दोन नातेवाईकांनाही अटक केली होती. जुलैला विजयची जामिनावर सुटका झाली. विजयची प्रकृती ठिक नसल्यामुळे तेवलगाव येथील एका नातेवाईकाकडे आले होते. दरम्यान जुलैला त्यांनी वलगाव येथील प्राथमिक आरोग्य केन्द्रात तपासणी करून घेतली. मात्र प्रकृतीत सुधारणा नसल्यामुळे जुलैला विजय यांना इर्विनमध्ये दाखल केले.
या ठिकाणीसुध्दा आराम झाला नाही अखेर गुरूवारी त्यांना सुपर स्पेशालीटीमध्ये आणले होते. विजय बुटके पोलिसांच्या कोठडीत होते त्यावेळी पोलिसांनी त्यांना जबर मारहान केली, त्यामुळेच हा मृत्यू झाल्याचा आरोप करत मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कारवाईची मागणी नातेवाईकांनी केली आहे. यावेळी गाडगेनगर पेालिसांचा ताफा सुपर स्पेशालीटीमध्ये दाखल झाला होता.
विजय बुटके
आरोपामुळे घेतला निर्णय
^विजयबुटके यांच्या नातेवाईकांनी आरोप केल्यामुळेच इनकॅमेरा शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेतला. तहसीलदारांनी पंचनामा केला असून शवविच्छेदन करण्यात येणार आहे. कैलाशपुंडकर, ठाणेदार, गाडगेनगर.

इनकॅमेरा शवविच्छेदन
नातेवाईकांनीआरोप केल्यामुळे पोलिसांनी सदर माहिती अमरावती तहसीलदारांना दिली. अमरावतीचे तहसीलदार शहरात नसल्यामुळे दुसऱ्या तहसीलदारांना बोलविण्यात आले होते. तसेच विजय बुटके यांचे शवविच्छेदन इनकॅमेरा करण्याचा निर्णय घेतला. गुरूवारी सायंकाळी शवविच्छेदन सुरू होते.