आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सराफा लुटमार प्रकरणी एसपींची घटनास्थळाला भेट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घटनास्थळाची पाहणी करताना पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह पोलिस कर्मचारी. - Divya Marathi
घटनास्थळाची पाहणी करताना पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह पोलिस कर्मचारी.
बाभुळगाव- येथीलसराफा व्यावसायिक सुधीर रोकडे यांना, दि. ११ रोजी सायंकाळी चार ते पाच अज्ञात दरोडेखोरांनी मारहाण करून त्यांच्याजवळील सोन्या -चांदीचा एेवज लंपास केला होता. या प्रकरणाची माहिती जाणून घेण्यासाठी , दि. १३ जुलै रोजी सायंकाळी वाजता जिल्हा पोलिस अधिक्षक अखिलेशकुमार सिंग यांनी घटनास्थळी भेट दिली.

या प्रकरणाची जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेश सिंग यांनी गंभीर दखल घेत घटनास्थळाची पाहणी केली. प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्या नुसार आरोपी गेलेल्या मार्गाची पाहणी करून चौकात असलेल्या रोकडे ज्वेलर्सलाही भेट दिली. दरम्यान, पोलिस अधिक्षकांनी जखमी झालेले सराफा व्यावसायिक सुधीर रोकडे यांना पोलिस स्टेशनमध्ये बोलावून त्यांच्याशी घटनेसंदर्भात चर्चा केली. यावेळी पोलिस निरीक्षकांसह कर्मचाऱ्यांना तपासाशी संबंधित काही टिप्स देवून, आरोपीचे स्केच, घटनास्थळावरील मोबाईल लोकेशन आदी माहिती संकलीत करण्यास सांगितले. यावेळी त्यांनी सुधीर रोकडे यांचे मित्र मंडळीसोबतही चर्चा करून आरोपींचा शक्य तितक्या लवकर शोध घेण्यात येईल, असे आश्वासन दिले.
बातम्या आणखी आहेत...