आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रबोधिनिचे ‘प्रबोधन’ खुंटले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - विदर्भातील चारपैकी धनुर्वदि्या आणि ज्युदो या खेळांची प्रबोधनिी अमरावतीत आहे. मात्र,तेथे कार्यरत अनियमित क्रीडा मार्गदर्शकांनी नियमित मानधन आणि सेवेत कायम करण्यासाठी कामगार न्यायालयात धाव घेतल्यामुळे येथील क्रीडा प्रबोधनिी सध्या बेवारस स्थितीत आहे. धनुर्वदि्या ज्युदो प्रशिक्षकांअभावी प्रबोधनिीतील खेळाडूंचे प्रशिक्षणच ठप्प पडले आहे.

जिल्हा क्रीडा अधिकारी (डीएसओ) प्रबोधनिीचे प्राचार्य असतात. परंतु, अमरावती येथील डीएसओंकडे यवतमाळ येथील कार्यालयाचा अतिरिक्त पदभार सोपवण्यात आल्यामुळे येथे कोणताही जबाबदार अधिकारी नाही. २० मुली २० मुले, अशा एकूण ४० खेळाडूंची काळजी करणारे कोणीच नसल्यामुळे त्यांची परवड सुरू आहे. राज्यात आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या प्रबोधनिीला घरघर लागली आहे.
गंभीर बाब अशी की, प्रबोधनिीतील मुलींच्या वसतिगृहाला महिला पर्यवेक्षक नसल्यामुळे त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. आपत्कालीन परिस्थिती उद्भवली, तर मुलांचे रक्षण करण्यासाठी गार्डही नाही किंवा रुग्णालयात नेण्यासाठी वाहन आणि शिपाईही नाही. त्यामुळे अमरावती येथील प्रबोधनिीतील वदि्यार्थी अडचणीत आहेत.

शासन निर्णयानुसार प्रबोधनिीत निवड झालेल्या खेळाडूंना त्याच शहरातील शाळांमध्ये प्रवेश दिला जातो. तेथे त्यांचे शिक्षण प्रशिक्षण होत असते. शासनाने सहा महनिे मानधनावर प्रबोधनिींमध्ये अनियमित कर्मचारी नियुक्त केले आहेत. दर सहा महनि्यांनी त्यांना मुदतवाढ दिली जाते, असे तकलादू धोरण १९९६ पासून कायम आहे. अचानक शासनाने प्रबोधनिीत नियुक्त राज्य क्रीडा मार्गदर्शकांचे पदच संपुष्टात आणले. नंतर त्यांना मुदतवाढही दिली नाही. त्यानंतर महनिे या क्रीडा मार्गदर्शकांनी मानधनावनिा काम केले. शासनाला वनिंती अर्ज पाठवले. मात्र, कोणीही दखल घेतली नसल्यामुळे बेरोजगार झालेल्या या प्रशिक्षकांना अखेर कामगार न्यायालयात धाव घ्यावी लागली. अमरावतीत जी प्रबोधनिी सुरू आहे ती धोका पत्करून चालवली जाते, असे खळबळजनक विधान क्रीडा युवक क्रीडा संचालनालयातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याने केले आहे.

प्रबोधनिी सुरू झाल्यानंतर एकदाच १९९६ मध्ये खेळाडूंसाठी शासनाने एकदाच टाटा सुमो हे वाहन दिले. मात्र, आता ते बनिकामाचे असल्यामुळे निर्लेखित करून भंगारात पडले आहे. त्यामुळे खेळाडूंना आपत्कालीन स्थितीत जर कुठे न्यायचे असेल, तर प्रबोधनिींकडे वाहनच नाही. एकतर स्वखर्चाने जावे लागते िकंवा ऐनवेळी कोणाचेही उसने वाहन मागावे लागते.
वदिर्भात नागपूर येथे हँडबाॅल अॅथलेटिक्स, अमरावतीत धनुर्वदि्या ज्युदो, अकोल्यात बाॅक्सिंग, गडचिरोलीत फिटनेस प्रबाेधनिी आहे. औरंगाबादमध्ये हाॅकी अॅथलेटिक्स प्रबोधनिी आहेत.

धोका पत्करून प्रवेश जबाबदारी घेणार कोण
आधी सेवानिवृत्त कर्नल असायचे प्राचार्य
प्रबाेधनिीचीयोजना सुरू झाल्यानंतर लष्करातील सेवानिवृत्त कर्नल प्रबोधनिीचे प्राचार्य असायचे. नंतर खर्च वाचवण्यासाठी आघाडी सरकारच्या कार्यकाळात िजल्हा क्रीडा अधिकाऱ्यांकडे प्राचार्यपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

भेदभाव मात्र कायम
सांगलीयेथील प्रबोधनिीतील कर्मचारी न्यायालयात गेल्यानंतर त्यांना लगेच कायमस्वरूपी सेवेत घेण्यात आले. अमरावतीसह विदर्भातील कर्मचारी अनेक महनि्यांपासून न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. अखेर त्यांना सर्वोच्च न्यायालयात जावे लागले.न्यायासाठी कामगार न्यायालयात गेले आहेत.

युतीचे सरकार राज्यात सत्तेवर असताना १९९६ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री क्रीडामंत्री मनोहर जोशी यांनी राज्यभरातील खेळाडूंच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रबोधनिी सुरू केल्या. मात्र, त्यानंतर या प्रबोधनिींची फारच वाईट स्थिती झाली आहे. त्यामुळे क्रीडा प्रबोधनिी स्थापनेचा उद्देश पूर्ण होऊ शकला नाही.

महिला पर्यवेक्षक नसल्याच्या अडचणी
अमरावती येथील प्रबोधनिीतील मुलींच्या वसतिगृहांमध्ये महिला पर्यवेक्षक हे पदच नाही. त्यामुळे महिला खेळाडूंना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यांच्या अडचणी समजून घेणारेही कोणी नाही. येथील धनुर्वदि्या ज्युदो प्रबोधनिीत राज्यभरातून २० मुली प्रशिक्षण शिक्षण घेण्यास आल्या आहेत. त्यांची काळजी घेणारी पर्यवेक्षकच नाही.

राज्यातील खेळाडूंच्या भवितव्याचा प्रश्न असल्यामुळे धोका पत्करून त्यांना प्रबोधनिीत प्रवेश दिला आहे. ज्या ठिकाणी प्रबोधनिी आहेत, तेथील क्रीडा उपसंचालक, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनीही तिकडे लक्ष द्यायला हवे. राजाराममाने, सह संचालक क्रीडा युवक सेवा संचालनालय, पुणे

अमरावतीच्या डीएसओंकडे यवतमाळचा अतिरिक्त कार्यभार आहे. ते कधी अमरावती तर कधी यवतमाळात असतात. त्यामुळे प्राचार्यांच्या अनुपस्थितीत जर अनुचित घटना घडली किंवा गैरप्रकार झाला तर त्यासाठी कोणाला जबाबदार धरायचे ?