आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गरजू विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी ‘आत्मसन्मान’ सदैव पाठीशी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - आत्महत्ये सारखा टोकाचा विचार करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यापासून परावृत्त करणे गरजेचे असून, त्यासाठी विचारधनाचा आधार घेतला जावा, असे मत स्मार्ट आत्मा समुपदेशन समूहाचे संचालक डॉ. मंगेश देशमुख यांनी व्यक्त केले आहे.
स्मार्ट आत्मा समुपदेशन समूहाचे लोकोपयोगी उद्देश सार्वजनिक करण्यासाठी गुरुवारी डॉ. देशमुख यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी त्यांनी हे मत व्यक्त केले. यासाठी काही पुस्तकांचा दाखला देत ते म्हणाले, यातील मौलिक धनच शेतकऱ्यांना आत्महत्येसारख्या टोकाच्या विचारांपासून परावृत्त करू शकते. त्यांच्या मते हे विचारधन घेतल्यानंतर शेतकरी सरकार किंवा अन्य कोणावरही अवलंबून राहता स्वयंबळावरच पुढे जाणार आहे.

त्यांच्या मते पीपीपी तत्त्वावरील हे केंद्र इतरांनाही मदत करणार आहे. पुस्तकांमध्ये विचारधन आत्मसात करून स्वयंपूर्ण झालेल्या वरुड तालुक्यातील नागझिरा गावाचे उदाहरणही त्यांनी दिले. या वेळी केंद्राचे समन्वयक गंगाधर नाखले इतर सहकारी उपस्थित होते.

परिस्थितीशीदोन हात करीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी आत्मसन्मान चेतना फाउंडेशनची दारे नेहमी उघडी असून, अशा विद्यार्थ्यांनी थेट संपर्क करावा, असे आवाहन फाउंडेशनचे संस्थापक प्रा. माधव कारेगावकर यांनी शुक्रवारी येथे एका पत्रकार परिषदेत केले.
ते म्हणाले की, गरजू विद्यार्थ्यांवर कोणतेही अनिष्ट संकट ओढवू नये, यासाठी चेतना फाउंडेशनने हे पाऊल उचलले आहे. अकोला जिल्ह्याच्या बाळापूर तालुक्यातील दधम येथील एका शाळकरी विद्यार्थ्याने अलीकडेच आत्महत्या केली. पुस्तके, गणवेश शालेय साहित्यासाठी त्याच्याकडे रक्कम नव्हती. त्याने माता-पित्यांकडे मागणी नोंदवली. मात्र, तुटपुंज्या मिळकतीमुळे तेही ती मागणी पूर्ण करू शकले नाहीत. भविष्यात ही वेळ आणखी कोणावर येऊ नये, याची काळजी म्हणून हा उपक्रम सुरू केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले की, विदर्भ हा तसाही अभावग्रस्त प्रांत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, उद्योगधंद्यांची वानवा, औद्योगिकदृष्ट्या असलेले मागासलेपण, अशा अनेक कारणांमुळे सर्वसामान्य पालक त्यांच्या पाल्यांना योग्य शिक्षण देऊ शकत नाही. अशा परिस्थितीत आत्मसन्मान चेतना फाउंडेशन त्यांच्या पाठीशी उभे राहणार असून, त्यांनी बिनदिक्कत मदत मागावी, असेही कारेगावकर यांनी सुचवले.

फार्मर्स पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट
शेतकऱ्यांसंबंधी सुरू असलेल्या शासकीय योजनांचा समाचार घेताना ते म्हणाले, शासनाने शेतकऱ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचे (फार्मर्स पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट) केंद्र सुरू केले पाहिजे. तसे झाल्यास शेतकरी स्वयंपूर्ण होण्याची खात्री निर्माण होणार असून, त्याद्वारेच आत्महत्यांचा प्रश्न थांबवला जाऊ शकतो.

कोण आहेत माधव कारेगावकर ?
माधवकारेगावकर हे निवृत्त पोलिस निरीक्षक आहेत. बडनेरासह शहराच्या विविध भागांत त्यांनी पोलिस अधिकारी म्हणून सेवा दिली आहे. निवृत्तीनंतर समाजकार्य करावे नव्हे निवृत्तीवेतनाचा किमान निम्मा हिस्सा समाजाच्या कामी लागावा, हा त्यांचा उद्देश आहे. अशाच उद्देशाने प्रेरित झालेल्या पोलिस खात्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांसह इतरांना त्यांनी फाउंडेशनमध्ये समाविष्ट करून घेतले आहे.

अशी मिळेल मदत
आत्मसन्मान चेतना फाउंडेशनकडून मदत मिळवण्यासाठी पालक अथवा विद्यार्थ्यांनी थेट कार्यालयात (तुळजाभवानी मंगल कार्यालयाच्या मागे, शेगाव-रहाटगाव रोड) संपर्क करावा. तपासणीअंती त्यांच्यातील गरजूंना मदत दिली जाईल.