आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात भुकेल्यांना ‘फूड पॅकेट्स’चे वाटप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - दैनिक दिव्य मराठीच्या अन्नदान उपक्रमाला प्रतिसाद देत शहरातील सामाजिक संस्थेत अग्रेसर असलेल्या फेथ फाउंडेशनने गेल्या सुखद सोमवारी प्रोजेक्ट रोटी अभियान सुरू केले आहे. १२ ऑक्टोबरपासून दररोज सायंकाळी शहरातील ४० भुकेल्यांना अन्नदान करण्यात येत आहे. फेथच्या या प्रोजेक्ट रोटी अभियानाच्या माध्यमातून फूड पॅकेट्सचे वाटप करून यशस्वीरीत्या मोहीम राबवण्यात येत आहे.

दरम्यान, फूड्स पॅकेटमध्ये असलेली भाजी, पोळी भातसोबतच फळांचे वाटपही शहरातील गरजूंना करण्यात येत आहे. संस्थेतर्फे यासंदर्भात सोशल मीडियावर एक पेज तयार करण्यात आले आहे. या पेजवर दररोज होणाऱ्या कार्यक्रमांची माहिती नागरिकांना देण्यात येत आहे. दररोज होणारे फूड पॅकेट्सचे वाटप, वाटप करतानाचे फोटो आदी सर्वच माहिती या पेजवर अमरावतीकरांना बघता येणार आहे. या प्रोजेक्टसंदर्भात माहिती हवी असल्यास त्यांना फेथ फाउंडेशन या पेजवर जाऊन माहिती घेता येईल, असे उमेकर यांनी सांगितले. शहरातील एकही बेघर निराधार व्यक्ती उपाशीपोटी राहू नये, यासाठी फेथ फाउंडेशनने प्रोजेक्ट रोटी हा स्तुत्य उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
फेथ फाउंडेशनच्या या प्रोजेक्ट रोटी अभियानाच्या माध्यमातून अमरावती शहरातील शेकडो भुकेल्यांना फूड पॅकेट्सचे वाटप करण्यात येत आहे.

फेथचा सेवाभावी उपक्रम : वृद्ध,मनोरुग्ण आणि लहान मुले यांच्यासाठी हा उपक्रम फेथने सुरू केला आहे. याच प्रकारातील गरजूंना पोळी, भाजी आणि भात देऊन त्यांना अन्नदान करण्याचे सेवाभावी काम करण्यात येत आहे. अन्न हे पूर्ण ब्रह्म असे म्हटले जाते. एकीकडे लग्नप्रसंग आणि हॉटेल्समध्ये अन्नाची प्रचंड नासाडी होते, तर दुसरीकडे अन्न मिळाल्यामुळे भुकेल्यांचा मृत्यू होतो. एकही व्यक्ती उपाशी झोपू नये, यासाठी हा उपक्रम फेथने सुरू केला आहे.

उत्स्फूर्त प्रतिसाद
^दररोज किमान ४० फूड पॅकेट्सचे वाटप गरजूंना करण्यात येत आहे. सध्या फेथ संस्थेतील स्वयंसेवक हे आपल्या घरूनच अन्नदान करीत आहे. स्वयंसेवकांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे. भविष्यात हॉटेल्सचालकांना तसेचनागरिकांना या उपक्रमात सहभागी करून घेण्यात येईल, त्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.'' पूजा उमेकर, फेथ फाउंडेशन.