आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकसहभागातून प्लास्टिक मुक्ती , प्रयास सेवांकुरतर्फे महिनाभर चालणार स्वच्छताग्रह माेहीम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहरस्वच्छ, सुंदर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी आता लोकसहभागातून वॉर्डा-वॉर्डातील नागरिकांनी परिसर स्वच्छ करण्याचा संकल्प घेतला आहे. ‘दिव्य मराठी’ने सुरू केलेल्या सहकारातून समाधान अभियानाला शहरातील नागरिक काही सामाजिक संस्थांनी हातभार लावला आहे. प्रभाग ३३ मध्ये ही स्वच्छताग्रह मोहीम राबवण्यात येत आहे. महिनाभर हे अभियान चालणार असून ऑगस्टला या अभियानाचा समारोप केला जाईल. प्रयास सेवांकुर संस्था संत गजानन महाराज सेवा समितीतर्फे हे अभियान राबवण्यात येत आहे.

दरम्यान, दररोज सकाळी सात ते नऊ वाजता प्रभागात हे अभियान राबवण्यात येत असून, नगरसेवक राजू महल्ले यांच्या पुढाकाराने नागरिक उस्फूर्तपणे अभियानात सहभाग घेत आहेत. सातपूर्वीच नागरिक स्वत:हून हजर राहतात. मग, सगळे जमल्यावर परिसर निश्चित करून साफसफाई केली जाते. या अभियानात डॉक्टर, वकील, अभियंता, तरुण-तरुणी, वृद्ध यांच्यासह सामाजिक चळवळीत सक्रिय असलेले ५० नागरिक दररोज दोन तास परिसरातील कचरा साफ करीत आहेत.

इतर शहरांच्या धर्तीवर अभियान : संपूर्णशहर स्वच्छ, सुंदर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी प्रयासतर्फे विविध अभियान राबवण्यात येत आहे. यासाठी डॉ. सावजी यांनी आपल्या स्वयंसेवकांसह पुणे, मुंबई बंगलोर येथील स्वच्छतेसंदर्भातील विषय हाती घेतले आहे. आेला सुका कचरा वेगळा करणे, प्लास्टिकची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी उपाययोजना काय आदी विविध उपक्रम राबवण्यात येत आहे.

दररोज निघतो ट्रकभर कचरा : दररोजहोणाऱ्या या अभियानातून परिसरातून ट्रकभर कचरा गोळा होत आहे. ऑगस्टनंतर या परिसरात कचरा दिसणार नाही, असा संकल्प येथील नागरिकांनी घेतला आहे.

ऑक्टोबरनंतर शहर होईल प्लास्टिकमुक्त
ऑक्टोबरनंतर संपूर्ण शहर स्वच्छ प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प आहे. शहर स्वच्छ जरी झाले नाही, तरी प्लास्टिकमुक्त करायचे आहे. यासाठी प्रयत्न सुरू असून, विविध अभियान राबवण्यात येत आहे. लोकसहभागातून हे शक्य असून, प्रभाक क्रमांक ३३ प्रमाणेच इतर प्रभागांतील लोकांनीही पुढाकार घ्यावा. हेच अभियान संपूर्ण शहरात राबवले जाईल.

सर्व्हिस गल्लीची स्वच्छता
प्रयास सेवांकुर संस्था संत गजानन महाराज सेवा समितीतर्फे प्रभाग क्रमांक ३३ मधील सर्व्हिस गल्लीत राबवलेल्या स्वच्छता मोहिमेत सहभागी नागरिक. दुसऱ्या छायाचित्रात कचरा उचलून तो गाडीत टाकत आहेत.

बातम्या आणखी आहेत...