आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंजाबच्या दोघांना केली वणीत अटक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती-नांदगावपेठठाण्याच्या हद्दीतील पिंपळविहीर येथे मागील काही दिवसांपासून एका ठिकाणी पोकलँडने काम सुरू होते. याच पोकलँडवर चालक असलेल्या दोघांनी मालकाला मजुरीचे पैसे मागितले, मात्र ते देण्यास मालकाकडून विलंब झाला असे म्हणून या दोघांनी पोकलँडचे १५ लाख रुपयांचे सुटे भाग चोरले होते. या दोघांना नांदगावपेठ पोलिसांनी अवघ्या २४ तासांत नाशिक जिल्ह्यातील वणी येथून अटक केली आहे. शनिवारी पहाटे पोलिस पथक दोघांनाही घेऊन शहरात पोहोचले आहे.
सुखपालसिंग सुखचैनसिंग संसोप (२६, रा. न्यू अाबादी, फतेगड रोड, अमृतसर, पंजाब) आणि विक्रमजितसिंग जतवनसिंग गुराय (२२, रा. सुखदासपूर, पंजाब) या दोघांना नांदगावपेठ पोलिसांनी वणी पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या अंबानेर गावातून शुक्रवारी दुपारी ताब्यात घेतले. सुखपालसिंग विक्रमजितसिंग हे दोघे मागील काही दिवसांपासून पुणे येथील एका व्यक्तीच्या पोकलँडवर चालक म्हणून कार्यरत होते. सध्या हे पोकलँडचे काम नांदगावपेठ ठाण्याच्या हद्दीतील पिंपळविहीर येथे सुरू होते. या दोघांनी पोकलँडचे चार पार्ट चोरून नेल्याची माहिती गुरुवारी रात्री नांदगावपेठ पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी शोध घेतला. त्या वेळी हे दोघे अंबानेरमध्ये असल्याचे समजले. त्यामुळे गुरुवारी रात्रीच पोलिस पथक अंबानेरला रवाना झाले. त्या ठिकाणी हे दोघेही सोबत होते.

त्यांच्याकडून पोलिसांनी चोरीला गेलेले पोकलँडचे सुटे भागसुद्धा जप्त केले आहे. त्यांना घेऊन पोलिस पथक शनिवारी पहाटे शहरात पोहोचले. पोकलँड मालकाला मजुरीचे पैसे मागितले, मात्र त्याने दिले नाही म्हणून आम्ही हे सुटे भाग नेले होते, असे त्या दोघांनी पोलिसांना सांगितले. या घटनेच्या अनुषंगाने पोलिस बारकाईने तपास करीत आहेत.

दोघांनाही अटक केली
^पोकलँडमालकाने मजुरीचे पैसे देण्यासाठी विलंब केला, त्यामुळेच आम्ही सुटे भाग घेऊन गेल्याचे दोघांनी सांगितले आहे. त्यांना वणी ठाण्याच्या हद्दीतून अंबानेरमधून अटक केली आहे. अनिलकिनगे, ठाणेदार,नांदगावपेठ