आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२८ तास संततधार, सर्वत्र दाणादाण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर जिल्ह्यात मंगळवारी पहाटेपासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने जिल्ह्यातील सर्वच नदी, नाले दुथडी भरून वाहायला लागले आहे. अनेक नद्यांनी तर धोक्याची पातळी ओलांडली होती. त्यामुळे अनेक गावांमध्ये नदीचे पाणी शिरले होते. त्यामुळे जिल्हाभरातील ७८९ घरांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. सर्वाधिक नुकसान वरुड तालुक्यात झाले असून, ३६८ घरांचे नुकसान झाले आहे. तविसा तालुक्यातील तविसा, तळेगाव ठाकूर, वरखेड या गावासंह इतर गावांतील ३०० पेक्षा अधिक घरांचे अशंत: नुकसान झाले आहे. याच वेळी दर्यापूर तालुक्यातील ११५ अचलपूर तालुक्यातील पाच घरांचे नुकसान झाल्याची जिल्हा प्रशासन दप्तरी नोंद झाली आहे. याच वेळी जिल्ह्यातील पूर्णा, अप्पर वर्धा, शहानूर, वरुड बग्गाजी, चंद्रभागा, सापन यांसह अन्य जलाशये तुडुंब भरल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. संततधार पावसामुळे खोलगट भागातील नदी-नाल्याकाठची शेती जलमय झाली आहे. या पावसामुळे पिकांना संजीवनी मिळाली आहे. तसेच जलस्रोतांमध्ये वाढ करण्यासाठी हा पाऊस समाधानकारक ठरणारा आहे.
बुधवारी दविसभर पावसाने उघाड दिल्यामुळे शहरातील मार्गावर वर्दळ वाढली होती. मात्र, सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान पुन्हा एकदा रिमझिम पावसाने हजेरी लावली होती.
बुधवारी रात्रीपर्यंत हा रिमझिम पाऊस सुरूच होता. या दमदार पावसामुळे वलगाव, रेवसा, भातकुली, नांदुरा किरक्टे यांसह अन्य गावांमधून वाहनारी पेढी नदीसुद्धा दुथडी भरून वाहत आहे. तसेच चांदूर रेल्वे येथील खडकपुरा येथे चार घरांच्या भिंती पडल्या. याच वेळी मोर्शी शहराच्या मध्यवस्तीतून वाहणाऱ्या दमयंती नदीला पूर आल्याने नदीकाठी असणारी सुलतानपुरा वस्ती जलमय झाली. नागरिकांच्या घरात पाणी गेल्याने वित्त हानी झाली आहे. घरातील धान्यासह इतर साहित्य भजिले आले.

मंगळवारी पहाटे वाजतापासून जिल्ह्यात सुरू झालेला संततधार पाऊस बुधवारी सकाळी वाजता थांबला असून, मागील २८ तासांत ‘नॉन स्टॉप' पडलेला हा पाऊस या मोसमातील आतापर्यंतचा सर्वाधिक समाधानकारक ठरला आहे. अप्पर वर्धासह जिल्ह्यातील सर्व धरणांचे दरवाजे उघडण्यात आल्याने नदी, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. अनेक मार्ग जलमय झाल्याने काही भागांतील वाहतूकसुद्धा विस्कळीत झाली होती. बुधवारी पाऊस थांबल्याने विस्कळीत झालेले जनजीवन हळूहळू पूर्ववत झाले. दरम्यान, जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी नुकसानग्रस्त भागांची पाहणी करून ग्रामस्थांना मदतीचे आश्वासन दिले.

जिल्हाधिकाऱ्यांनी केली प्रत्यक्ष पाहणी -
अमरावती तालुक्यात असलेल्या देवरी, नांदुरा किरक्टे आणि दोनद या गावांमध्ये जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी बुधवारी दुपारी पाहणी केली. या तिन्ही गावांना बुधवारी सकाळच्या सुमारास पाण्याने वेढले होते. या वेळी जिल्हाधिकाऱ्यांनी गावकऱ्यांसोबत संवाद साधला. गावकऱ्यांच्या समस्या या वेळी त्यांनी जाणून घेतल्या. दोनदच्या सभामंडपात गुरे दिसल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली, अशा आपत्तीच्या काळात ग्रामस्थांना सहारा घेण्यासाठी सभामंडपासारख्या वास्तू उपलब्ध व्हायला पाहजिे.

आपत्तीव्यवस्थापन चमू सक्रिय :
जिल्ह्यातकोसळत असलेला पाऊस लक्षात घेता कोणत्याही क्षणी आपत्ती व्यवस्थापनाची वेळ येऊ शकते. त्यासाठी जिल्हा प्रशासनाची आपत्ती व्यवस्थापन चमू तैनात करण्यात आली आहे. या चमूमध्ये पोलिस, अग्निशामक दल, होमगार्ड तसेच महसूल विभागाचे मिळून ५० जवान आहेत. तसेच तीन बोट तयार आहेत.

निम्न वर्धा धरणाची ३१ दारे उघडली
वरुड बगाजीजवळ असलेल्या निम्म वर्धा धरणाची ३१ दारे २२ सेंमीने उघडण्यात आल्याची माहिती आहे. यातून ४०३ क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. धामणगाव तालुक्यातील काही गावांमध्ये संततधार पावसामुळे ४७ घरांचे अंशत: नुकसान झाल्याचे महसूल विभागाकडून कळवण्यात आले आहे. तहसीलदार श्रीकांत घुगे यांनी नायगाव, वरुड बगाजी आदी गावांचा दौरा करून पाहणी केली. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पावसामुळे वरुड तालुक्यात ३६८ घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. शाखा अभियंत्यांच्या माध्यमातून संबंधित तलाठ्यांना पंचनामा करण्याचे आदेश तहसीलदार बाळासाहेब तिडके यांनी दिले. राजुराबाजार येथे नामदेव रायबान वाघ यांचे घर पडल्याने त्यांना हजार दोनशे रुपयांची मदत दिली.

अप्पर वर्धा धरणाचे १३ दरवाजे उघडले
मदतीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज
जिल्ह्यातमंगळवारपासून दमदार पाऊस सर्वत्र जिल्ह्यात कोसळत आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच धरणांचे दरवाजे उघडण्यात आले होते. तसेच नद्या दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे सात ते आठ गावांचा संपर्क तुटला होता. जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात आहे. पावसामुळे काही समस्या उद्भवल्यास त्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. आपत्ती व्यवस्थापनाच्या चमू जिल्हास्तरावर तयार आहेत. मोहनपातूरकर, नविासी उपजिल्हाधिकारी , अमरावती.

मध्य प्रदेशातही मुसळधार सुरू असल्याने जिल्ह्यातील सिंभोरा येथील अप्पर वर्धा धरणाचे तेराही दरवाजे बुधवारी सकाळी ११ वाजता फुटापर्यत उघडण्यात आले. विश्रोळी धरणाचे नऊही दरवाजे ५० सेंटिमीटरने उघडण्यात आले. शहानूरचे चारही दरवाजे, वरुड बग्गाजी तलावाचे ३१ दरवाजे, सापनचे चार, चंद्रभागाचे दरवाजे उघडण्यात आले. याच वेळी चारगड प्रकल्प पूर्ण भरल्यामुळे ओव्हर फ्लो झाला आहे.याच वेळी अमरावती शहरात असलेला वडाळी तलावसुद्धा ओव्हर फ्लो होऊन वाहत आहे.

पेढी नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहत होती. त्यामुळेच पेढीच्या काठावर असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. मात्र, मंगळवारी मध्यरात्रीच पाणी अचानकपणे वाढल्याने अमरावती तालुक्यातील रोहनखेड, सावंगा, थुगाव, फाललापूर, देवरा या गावांचा संपर्क तुटला होता. या गावांना चारही बाजूंनी पाण्याने वेढले होते. तसेच अचलपूर तालुक्यातील शिंदी आणि कुष्ठा या गावांचासुद्धा संपर्क तुटला होता. मात्र, बुधवारी सकाळी पाण्याने उघाड दिल्यामुळे गावामध्ये शिरलेले पाणी कमी झाले. याच वेळी भातकुली, आसरा, देवरी, तविसा तळेगाव ठाकूर, वरखेड या गावांमध्ये पाणी शिरले होते. तसेच वलगावजवळ कुंड सर्जापूर येथील पूल पाण्याखाली आला होता.
बातम्या आणखी आहेत...