आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिकांनी टाकल्या माना, ¾ चार दिवसांत पाऊस आल्यास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - महिनाभरापासून पाऊस गायब झाल्यामुळे आता पिकांनी माना टाकण्यास सुरुवात केली आहे. महिनाभरात पीकवाढीसाठी अनुकूल वातावरणही निर्माण झाल्याने सध्या पाऊस आल्यास आहे त्या पिकांतून उत्पादनात कमालीची घट येण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे. येत्या पाच सहा दिवसांत पाऊस आल्यास कोरडवाहू हलक्या जमिनीतील पीक मोडावे लागण्याची शक्यता निर्माण झाली असून, सातत्याच्या दुष्काळी परिस्थितीमुळे ग्रामीण भागातील अनेक सामाजिक आर्थिक प्रश्न जटील होण्याची भीती निर्माण झाली आहे.
मागील तीन वर्षांपासून जिल्ह्यात सातत्याने अतिवृष्टी, गारपीट दुष्काळी परिस्थितीमुळे खचलेल्या शेतकऱ्यांच्या जखमांवर या वर्षी दीर्घ पावसाच्या उसंतीने मीठ चोळले आहे. मागील दोन वर्षांत अतिवृष्टीमुळे खरीप तर अवकाळी गारपिटीमुळे रब्बी हंगामातील पिकांना जबर हादरे बसल्यामुळे शेतक-यांचा आर्थिक कणा मोडला आहे. जिल्ह्यात अल्प अत्यल्प भूधारकांची संख्या सर्वाधिक असल्यामुळे आतापर्यंत या शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती पार ढवळून निघाली होती. या वर्षी पावसाने घेतलेल्या दीर्घ विश्रांतीमुळे बडे शेतकरीही हादरले असल्याचे िचत्र जिल्ह्यात निर्माण झाले आहे. मागील दोन वर्षांत अतिवृष्टी गारपिटीच्या तडाख्यातही जिल्ह्यात सोयाबीन, कापूस हरभऱ्याचे समाधानकारक उत्पादन शेतकऱ्यांनी हिकमतीने काढले होते. परंतु, बाजारात सर्वच शेतमाल बेभाव विकल्यामुळे भविष्यात येणाऱ्या संकटात उभे राहण्याची आर्थिक क्षमता शेतकऱ्यांमध्ये िनर्माण होऊ शकली नाही.

आता पेरणीची सोय नाही
दोन एकरातील कपाशीच्या पिकासाठी पाच हजार रुपये खर्च लावला. आता पीक सुकू लागले आहे. मोड आल्यास आता पेरणीचीही सोय राहिली नाही. त्यामुळे शेतीसाठी खर्च करावा की नाही,हा प्रश्न उभा ठाकला आहे. सुरेशअजमिरे, शेतकरी,शिरजगाव कसबा.

पाऊस आला तरी पीक जगणार नाही
उसनवारी करून वावर पेरलं होतं. पाऊस नसल्यानं आता पिकांनी मान टाकली आहे. आता पाऊस आला तरी पीक जगणार नाही. दुबारची सोय नाही. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना सढळ हाताने मदत करण्याती गरज आहे. रंजितलहाने, शेतकरी,खांबोरा

हात जोडण्याशिवाय काय करू?
शेतात ३५ हजार रुपयांचे बियाणे नेऊन टाकले आहे. पाऊस यावा पीक जगावं म्हणून खिचडीही शिजवली. रोज आभाळाकडे हात जोडून देवाला करत आहो. यापेक्षा आता काय करू शकतो? सुभाषलंगडे, शेतकरी.

दमडीही येणार नाही
सर्वपैसा शेतात नेऊन टाकला आहे. चार-पाच दिवसांत पाऊस आल्यास दमडीही घरात येणार नाही. पावसाअभावी जनावरांच्या चाऱ्याची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. संदीपअरबट, शेतकरी,खुर्माबाद, ता. अचलपूर.

हाताला कामही नाही
पाऊस नसल्यामुळकामे ठप्प झाली आहेत. कास्तकारांचा जीवात जीव नाही. कुणीच कामाला सांगत नाही, त्यामुळे दिवसभर घरीच बसावं लागत आहे. मजुरी नसल्यामुळे कुटुंबाचा गाडा चालवणंही झालं आहे. केशवटेंभरे, शेतमजूर,चांदूर रेल्वे.

पाऊस आल्यामुळे चांदूर रेल्वे तालुक्यात सोयाबीनच्या पेरण्या अशा विरळ निघाल्या आहेत. त्यातच आता पावसाच्या दडीने या पिकांनी माना टाकण्यास सुरवात केली आहे. विरळ पिकामुळे उत्पादनात आत्ताच घट निर्माण झाली आहे.
बातम्या आणखी आहेत...