आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार तालुक्यांमध्ये गडगडाट; बाकी ठिकाणी मात्र ठणठणाट!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - मागीलचोवीस तासांत निर्माण झालेल्या मुसळधार पावसाचे वातावरण जिल्ह्यासाठी औटघटकेचे मृगजळ ठरले. यामुळे काळ्या ढगांकडे आशेने पाहणाऱ्या शेतकऱ्यांची घोर निराशा झाली. केवळ चार तालुक्यांत विजेच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळला असून, उर्वरित तालुक्यात केवळ पावसाची ‘फवारणी’ झाली.
त्यामुळे जिल्ह्याच्या बहुतांश शिवारात ठणठणाट कायम आहे. पिकांसाठी अमृतासारखा ठरलेल्या या पावसामुळे पिके काही प्रमाणात एकदम तरारली असून, अद्यापही दमदार पावसाची आशा शेती उद्योजकांना लागून राहिली असून, पीक सुकण्याचा धोका अद्यापही कायम असलेल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे.

मागील चोवीस तासांत जिल्ह्यात मुसळधार पाऊस येईल, अशी आशा निर्माण करणारे चत्र वातावरणात निर्माण झाले होते. ग्रामीण भागात सध्या पाऊस कधी येणार, हा एकच प्रश्न प्रत्येकाच्या तोंडी असून, या वातावरणामुळे मोठी आशा शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली होती. परंतु, बुधवारी रात्री झालेली मेघगर्जना अमरावती, तिवसा, धारणी, चांदूररेल्वे तालुक्यातील काही भागांसाठीच सुखावणारी ठरली. या तालुक्यातील काही भागांत मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळला. हलक्या जमिनीतील सोयाबीन, कपाशी, तूर आदी पिकांसाठी हा पाऊस तहानेने तडफडणाऱ्याच्या डोळ्यावर पाणी शिंपडून झापड जावी, असा ठरला. अमृतासारखा ठरलेल्या या पावसामुळे मरणासन्न पिके एकदम तरारली आहे. जिल्ह्यातील चार तालुके वगळता इतर तालुक्यांत पावसाने फक्त ‘फवारणी’ केली.

ग्रामीणभागात वाढता ताण : जिल्ह्यातपावसाची दडी कायम असून, दिवसागणिक शेतकऱ्यांरील तणाव वाढत असल्याचे चित्र खेडोपाडी दिसून येत आहे. प्रत्येकाच्या तोंडी पाऊस कधी येणार हाच प्रश्न दिसून येत आहे. पाऊस आल्यास निर्माण होणाऱ्या आर्थिक सामाजिक प्रश्नांमुळे आतापासूनच ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर तणाव दिसून येत असल्याचे वास्तव आहे.

पुढील पाच दिवसही तुरळकच पाऊस : जिल्ह्यातपुढील पाच दिवस केवळ तुरळकच पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. जिल्ह्यातील काही भागांत सरासरी शनिवारी २० मिमी, रविवार १३ मिमी, सोमवार १५ मिमी, तर मंगळवारी मिमी तुरळक पाऊस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

काळ्या वावरात काय पेरावं?
जिल्ह्यातअनेक शेतकऱ्यांनी पिके मोडली आहेत. सध्या पाऊस आला तरी सोयाबीन, मूग, उडीद, कपाशी, तूर आदी प्रमुख पिकांच्या पेरणीची वेळ निघून गेली आहे. सूर्यफुलाच्या पिकाचा पर्याय शेतकऱ्यांसमोर आहे. परंतु, पोपट इतर पक्ष्यांच्या उपद्रवामुळे सूर्यफूल पेरावे की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. जिल्ह्यातील बहुतांश काळी शेतं शेतकऱ्यांनी रब्बीच्या पेरणीसाठी सोडून दिली आहेत.

जिल्ह्यातील मागील २४ तासांतील पाऊस
सोयाबीनचे उत्पादन घटण्याची शक्यता
जिल्ह्यातसर्वाधिक पेरा सोयाबीनचा असून, संकरित कमी दिवसाचे वाणाची मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे. पावसाच्या दडीमुळे सोयाबीनला प्रचंड ताण बसला असून वाढही खुंटली आहे. कमी दिवसाचे वाण असल्यामुळे सोयाबीनला लवकरच फुलोर येणे सुरू झाले आहे. वाढीच्या दिवसातच पावसाने दीर्घ दडी मारल्यामुळे सोयाबीनची योग्य वाढ होऊ शकली नाही. त्यामुळे फुलोरावर सुटलेल्या झाडांना कमी शेंगा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यातच पाऊस आल्यास या शेंगाही भरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पाऊस (मिमी.)
अमरावती ३८.४
भातकुली १३.३
चांदूररेल्वे ४२
नांदगाव खं. २०
धामणगावरेल्वे ११.४
तिवसा ५३.५
मोर्शी १०.८
वरूड १५
अचलपूर
चांदूरबाजार ४.१
दर्यापूर ४.५
अंजनगावसुर्जी २.५
धारणी ४४.९
चिखलदरा १६.९
एकूण १९.८

दमदार पावसाची गरज
जिल्ह्यातजो काही थोडाथोडका पाऊस आला. त्यामुळे पिकांना काहीसा फायदा झाला. परंतु, अद्यापही दमदार पावसाची आवश्यकता आहे. उदयकाथोडे, जिल्हा कृषी विकास अधिकारी.
------------------------------------