आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लष्करी जवानांना राखी पाठवण्याचे अावाहन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - देशांच्या सीमांचे रक्षण करत जीव धाेक्यात घालत प्रसंगी प्राणांची अाहुती देणाऱ्या सीमेवरील जवानांना यंदाच्या राखी पाैर्णिमेलाही राख्या पाठवाव्यात, असे अावाहन माजी नगरसेविका रश्मी नावंदर यांनी केले अाहे.

अमरावतीतून गतवर्षी ४५ हजार राख्या जवानांसाठी पाठवल्या हाेत्या. माहेश्वरी महिला मंडळ, सुतार विश्वरचियता बहुउद्देशीय संस्था, राष्ट्रीय जैन महिला जागृती मंच, दीपज्याेती बहुउद्देशीय संस्था, प्रगती महिला मंडळ, स्पार्कन स्मृती िशक्षण ग्रुप, अराेमा जेसीज, खंडेलवाल महिला मंडळ, अंबापेठ महिला मंडळ, एकवीरा स्कूल अाॅफ ब्रिलियंट दर्यापूर, राजेश्वरी स्कूल, अमरावती या संस्थातर्फे रश्मी नावंदर, सीमा शर्मा, संजय नागलिया, प्रकाश अवतरामाणी, प्रीती महेंद्र, संगीता मुंदडा, अॅड. राजीव महेंद्र, घनश्याम नावंदर, संजय मेंडसे, ज्याेत्स्ना शेटे, पूनम पनपालिया दर्यापूर, सुनीता शहाकर, रमजान भाई, महेंद्र भुतडा, शाेभा बजाज, मालती राठी, शाेभा बजाज, शाेभा नवलकर अादींनी केले अाहे.