आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवैध खोदकाम; राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- महापालिकेच्याहद्दीतील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत भागात रिलायन्सच्या वतीने होत असलेल्या खोदकामासंदर्भात राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक झाली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीचे युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हृषीकेश वैद्य यांनी कार्यकर्त्यांसह महानगरपालिकेचे उपायुक्त विनायक आैगड यांनी मंगळवारी निवेदन दिले. महापालिकेचे आयुक्त चंद्रकांत गुडेवार दौऱ्यावर असल्याने वैद्य यांनी आैगड यांना निवेदन दिले.

कंपनीतर्फे शहरातील काही मुख्य रस्ते कॉलनीमध्ये अवैधरीत्या खोदकाम केबल टाकण्याचे काम करण्यात येत असल्याची बाब वैद्य यांनी महापालिकेच्या लक्षात आणून दिली. कठोरा रोडवरील ऊर्जा कॉलनी ते गुरुदेव कॉलनी (कॉटन ग्रीन कॉलनी नंबर २) रोडवर अवैधरीत्या सदर कंपनीने खोदकाम करून केबल टाकण्याचे काम सुरू केल्याचा आरोप वैद्य यांनी केला. कंत्राटदाराला यासंदर्भात कार्यकर्त्यांनी विचारपूस केली असता कंपनीकडे संपूर्ण अमरावती शहरात खोदकाम केबल टाकण्याची परवानगी आहे, असे सांगण्यात आले. तथापि, संबंधित कंत्राटदाराला परवानगी मागितली असता त्यांनी २०१३ सालची परवानगी पत्र दाखवल्याचे वैद्य यांनी सांगितले. २०१३ ची परवानगी दाखवून महापालिका तथा शासनाची दिशाभूल करून कंपनी शहरात अवैध बांधकाम करत असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. कंपनीने हे अवैध खोदकाम बंद करावे, अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला.

तरकंपनीवर फौजदारी गुन्हे : कंपनीनेज्या परिसराची परवानगी घेता त्या ठिकाणी खोदकाम सुरू केले आहे, त्यावर कारवाई केली जाईल. दोषी आढळल्यास कंपनीवर फौजदारी प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात येईल, असे महापालिकेच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. ज्या रस्त्याचे शुल्क कंपनीने भरले नाही, अशा रस्त्यांवर खोदकाम होत असेल, तर ही गंभीर बाब आहे, असे सूत्रांनी सांगितले.

कंपनीला कुठलीही परवानगी नाही
२०१३सालची परवानगी दाखवून कंपनी संपूर्ण शहरात अवैधरीत्या खोदकाम करत आहे. यासंदर्भात उपायुक्तांना विचारले असता, परवानगी देण्यात आली नसल्याचे त्यांनी सांगितले. रिलायन्स कंपनीचा हा संपूर्ण गोरखधंदा सुुरू आहे. याकडे महापालिका प्रशासनाने काळजीने लक्ष द्यावे, तीव्र आंदोलन केले जाईल. हृषीकेशवैद्य, जिल्हाध्यक्ष.
बातम्या आणखी आहेत...