आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रतन इंडियामुळे उजळले १६० प्रकल्पग्रस्तांचे भाग्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - नांदगावपेठ पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या रतन इंडिया वीज कंपनीमुळे स्थानिक प्रकल्पग्रस्तांचे भाग्य उजळले आहे. वीज प्रकल्पात तब्बल १६० प्रकल्पग्रस्तांना कंपनीकडून सामावून घेण्यात आले आहे. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाला देखील यश प्राप्त झाले आहे.

एमआयडीसीने या परिसरात औद्याेिगक वसाहत निर्माण करण्याचा निर्णय घेतला आणि सुमारे १८०० हेक्टर शेत जमिनी अधिग्रहीत करण्यात आल्या. औद्योगिक वसाहत होणार असल्याने उद्योगांमध्ये नोकरी मिळेत म्हणून येथील नागरिकांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. १९९५ मध्ये शेत जमीन अधिग्रहीत करण्यात आल्या, मात्र एमआयडीसीचा विकास झाला नाही. उद्योगधंदे आले नाही, त्यामुळे येथील प्रकल्पग्रस्तांचे मागील २० वर्ष वाया गेले. १९९५ मध्ये जे युवक रोजगार क्षम होते, त्यांना रोजगार मिळाला नाही. परिणामी अनेक लोकांवर स्थलांवर करण्याची वेळ आली. नोकरी मिळेल तेथे स्थानिक होण्याखेरीज त्यांच्याकडे अन्य पर्याय नव्हता, तर काहींनी छोटे व्यवसाय करीत उदरनिर्वाह भागवला. जमिनी एमआयडीसीमध्ये गेल्या असल्या तरी औद्योगिक विकासाची फळे त्यांना चाखता आली नाही. वास्तविक पाहता रतन इंडिया वीज प्रकल्पामध्ये प्रकल्पग्रस्तांची एकूण संख्या २८५ ऐवढी आहे. मात्र प्रत्यक्षात १९३ प्रकल्पग्रस्त नोकरीसाठी पात्र ठरले. अनेक लोक येथून स्थलांतर करुन गेले असल्याचे या आकड्यांवरून स्पष्ट होते. ३३ प्रकल्पग्रस्तांची कागदपत्रांमध्ये त्रृटी असल्याने सद्यस्थितीत त्यांना सामावून घेण्यात आले नाही. मात्र १६० प्रकल्पग्रस्तांना सामवून घेण्याचे वीज कंपनीने निश्चित केले आहे.

रोजगाराच्या शोधार्थ येथील अनेक युवक मुंबई, पुणे, औरंगाबाद येथे नोकरीच्या शोधात जातात. मात्र रतन इंडियाने नोकरी दिल्याने १६० प्रकल्पग्रस्त कुटुंबावरील स्थलांतराचे संकट टळले आहे. याबद्दल प्रकल्पग्रस्तांनी चेअरमन राजीव रतन, प्रकल्प संचालक डॉ. शरद किनकर, उपाध्यक्ष कर्नल लोकेशसिंग यांचे आभार मानले आहे.