आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रविनगरात भरदुपारी साडेतीन लाखांची घरफोडी, गुन्हा दाखल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- राजापेठपोलिस ठाण्याच्याच हद्दीत असलेल्या रविनगरमध्ये राहणाऱ्या एका व्यावसायिकाच्या घरात प्रवेश करून चोरट्याने सोन्याच्या दागिन्यांसह रोख असा लाख ६९ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना साेमवारी (दि. ६) दुपारी घडली. या प्रकरणी सोमवारी रात्री उशिरा पाेलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
रविवारी सकाळी डाॅ. राजेंद्र कलंत्री यांच्या घरातून दहा लाखांची रोकड लंपास केल्याच्या घटनेनंतर लगेच दुसऱ्या दिवशी भरदुपारी घडलेल्या या चोरीमुळे राजापेठ पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दीपक गणेशलाल साहू यांचे रविनगरमध्ये घर आहे. त्यांचे याच परिसरात किराणा दुकान आहे. सोमवारी दुपारी साहू त्यांच्या कुटूंबातील सदस्य घरातच होते. या वेळी घराचे दार उघडे होते. साहू इतर सदस्य आराम करीत असताना उघड्या दारातून चोरटा घरात आला. त्याने कपाटात ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यांवर हात साफ केला. या वेळी चोरट्याने सोन्याच्या बांगड्या, ३० ग्रॅमच्या अंगठ्या, सोनसाखळ्या, पाटल्या अन्य दागिने असे जवळपास लाख ३७ हजारांचे दागिने लंपास केले. तसेच ३० हजारांची रोकडसुद्धा चोरली. विशेष म्हणजे ज्या कपाटात दागिने रोख होती, तेच कपाट चोरट्याने फोडले. कारण घरात इतरही दोन कपाट होते, मात्र चोरट्याने ते फोडले नसल्याचे राजापेठ पोलिसांनी सांगितले आहे.

सोमवारी सायंकाळच्या सुमारास साहू यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. चोरीबाबत त्यांनी राजापेठ पोलिसांना माहिती दिली. राजापेठचे ठाणेदार शिवा भगत पथकासह घटनास्थळी पोहोचले. दीपक साहू यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध सोमवारी रात्री घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

राजापेठ ठाण्याच्याच हद्दीत राहणाऱ्या डॉ. राजेंद्र कलंत्री यांच्याकडे रविवारी एका लुटारूने घरात जाऊन दहा लाखांची रोख लुटली आहे. त्या लूट प्रकरणात अद्याप पोलिसांना सुगावा लागला नसतानाच दुसऱ्या दिवशी ही साडेतीन लाखांची चोरी झालेली आहे. विशेष म्हणजे राजापेठ ठाण्याच्या हद्दीत यापूर्वी झालेल्या अनेक चोऱ्या अजूनही उघड झालेल्या नाहीत. त्या चोरट्यांनाही अटक करण्यात शहर पोलिसांना अद्याप यश आलेले नाही.