आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जप्त वाळूच्या लिलावातून साडेसात लाखांचा ‘महसूल'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- वाळूची चढ्या दराने विक्री करण्यासाठी शहरालगत मोठ्या प्रमाणात साठवून ठेवलेल्या ४८ वाळूसाठ्यांवर अमरावती तहसील कार्यालयाच्या पथकाने जप्तीची कारवाई केली. या वेळी वाळूसाठ्यांच्या मालकीहक्कासाठी कुणीही पुढे आल्याने शेवटी ४८ पैकी २० वाळूसाठ्यांचा िललाव केला. या माध्यमातून अमरावती तहसील कार्यालयाला तब्बल लाख ८२ हजार रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. मागील दाेन महिन्यांत महसूल विभागाने राबवलेल्या या धडक मोहिमेमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले असून, वाळू तस्करीला बऱ्यापैकी लगाम लागला आहे.
अधिकृत ठिय्यावरून वाळू शहरात किंवा शहराच्या आजूबाजूने असलेल्या मोकळ्या जागेत आणून टाकायची आणि आवश्यकतेनुसार ती वाळू विक्री करायची. त्या विक्रीमधून दामदुप्पट भाव घ्यायचा, असा व्यवसायच काहींनी वर्षानुवर्षांपासून थाटला आहे. ही बाब महसूल विभागाच्या लक्षात येताच अमरावती तहसील कार्यालयाने अशा वाळूसाठ्यांकडे लक्ष केंद्रित केले आहे.

अमरावती तहसीलच्या परिसरात अमरावती शहर शहरालगतचा भाग येतो. दरवर्षीच शहरात किंवा शहरालगतच्या मोकळ्या जागेत वाळूंचे साठे दिसून येतात. यांतील काही साठे हे बांधकाम व्यावसायिकांचे असतात. मोठमोठ्या
लाख ८२ हजार ५० रुपये महसूल
२८ साठ्यांचा महसूलकडून लिलाव
वाळूसाठ्यांचा तीन वेळा केला लिलाव
एक हजार २९१ ब्रास वाळू केली जप्त
मागील दोन महिन्यांत ४८ वाळूसाठे जप्त

अवैध वाहतूक, १२ लाखांचा दंड वसूल
वाळूचीअवैध वाहतूक केल्याची माहिती मिळाल्याच्या आधारे अनेकदा महसूल प्रशासनाकडून कारवाई करण्यात येते. मागील पाच महिन्यांत अशा प्रकारच्या २४ कारवाई करून अमरावती तहसील प्रशासनाने १२ लाखांचा दंड वसूल केला आहे. याच प्रकारच्या दोन कारवाईमध्ये वाहनधारकाला महसूल प्रशासनाने प्रत्येकी लाख ७५ हजार रुपये ८० हजारांचा दंड ठोठावला आहे. ही दोन्ही प्रकरणे न्यायालयात पोहोचली आहेत. त्यामुळे त्यावर निर्णय होणे बाकी आहे.

जप्त वाळूसाठ्यांना पोलिस संरक्षण
^महसूलप्रशासनाने कारवाई केल्यानंतर रात्रीच्या वेळी किंवा दिवसासुद्धा अशा ठिकाणांवरून वाळूची चोरी होऊ शकते. त्यामुळे अशा साठ्यांच्या सुरक्षिततेसाठी तहसीलदारांच्या मागणीवरून आम्ही पोलिस विभागातर्फे सुरक्षा देतो. तपोवन परिसरात या वेळी तहसीलदारांनी मागणी केल्यामुळे आम्ही काही दिवस त्या ठिकाणी गस्त घातली होती. तहसीलदारांकडून पुन्हा मागणी झाल्यास त्यांच्या मागणीप्रमाणे पोलिस संरक्षण दिले जाईल,'' कैलाशपुंडकर, ठाणेदार,गाडगेनगर.

उर्वरित २० साठ्यांचा बुधवारी लिलाव
^शहरातपरिसरात मोठ्या प्रमाणात वाळूचे अवैध साठे जप्त करण्यापूर्वी ते कोणाच्या मालकीचे आहेत याचाही शोध घेतला जातो. मात्र, वरील कारवाईमध्ये कोणीही पुढे आले नाही. दोन महिन्यांत ४८ साठे जप्त केले. त्यांपैकी २८ साठ्यांच्या लिलावातून लाख ८२ हजार ५० रुपयांचा महसूल प्राप्त झाला. या कारवाईमुळे वाळू तस्करीला लगाम बसला आहे. उर्वरित २० साठ्यांचे बुधवारी १६ सप्टेंबरला लिलाव होणार आहे.'' सुुरेशबगळे, तहसीलदार,अमरावती.

पहिल्यादांच अशा प्रकारची कारवाई
मोकळ्याजागेत वाळूचे साठे तयार करणे ही बाब नवीन नाही. दरवर्षीच अशा प्रकारचे साठे अमरावतीतील अनेक भागांत पाहायला मिळतात. यापूर्वी अशा साठ्यांवर तहसील प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई केली जायची. प्रशासनाने दंड ठोठावला की वेगवेगळ्या मार्गातून तो दंड कमी करून किंवा दंड माफ करून ती वाळू सोडवून घ्यायचे. मात्र, यंदा पहिल्यांदाच थेट जप्ती जप्तीनंतर तातडीने लिलाव करण्यात आले. त्यामुळे कारवाईसुद्धा यशस्वी झाली शासनाच्या महसुलातही भर पडली आहे.