आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुरीवर ‘फायटोप्थेरा ब्लाइट’चे नवे संकट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - जिल्ह्यातीलकाही भागांत तुरीवर ‘फायटोप्थेरा ब्लाइट’ रोगाचे आक्रमण झाल्यामुळे पीक अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. जिल्ह्यात कमी खर्चात अधिक उत्पादन देणारे आतंरपीक म्हणून तुरीची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात येते. या वर्षी तुरीचे दर बाजारात १४ हजार रुपयांपर्यंत गेल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये या वर्षी किमान या पिकाकडून मोठ्या आशा निर्माण झाल्या होत्या. मागील वर्षी तुरीचे उत्पादन अत्यल्प झाल्यामुळे भाव वाढले होते. परंतु, सध्या जिल्ह्यात तुरीचे पीक फुलोरावर असून, बागायत पट्ट्यातील पीक जोमदार आहे. या वर्षी सोयाबीनचे उत्पादन नसल्यात जमा असल्यामुळे किमान आंतरपीक असलेल्या तुरीच्या पिकातून शेतकऱ्यांना मोठ्या आशा लागल्या आहेत. अशातच तुरीच्या खोडाला गाठी येण्याचे प्रमाण या वर्षी अधिक दिसून येत आहे. तुरी फुलोरावर असल्यामुळे फांद्याचे वजन वाढले आहे. यामुळे तुरीचे झाड गाठ आलेल्या ठिकाणावरून तुटून कोलमडत असल्याचे शेतकऱ्यांना दिसत आहे. जिल्ह्यातील शिराळा, बोराळा, खराळा, पुसदा, खरवाडी आदी पट्ट्यांमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव अधिक असल्याचे दिसून येत आहे. जोमदार असलेल्या तुरी यामुळे कोलमडून पडत असून, झाडे वाळत आहे. सोयाबीनने दगा दिल्यानंतर आशा टिकून असलेले तुरीचे पीकही दगा देते की काय, अशी भीती शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाली आहे.
मागील वर्षी तुरीच्या उत्पादनात कमालीची घट होऊन भाव वाढल्यामुळे या वर्षी तुरीच्या पेरणीत कमालीची वाढ झाली आहे. परंतु, या भाववाढीचा फायदा व्यापाऱ्यांनाच सर्वाधिक झाला. दरम्यान, सरासरी सहा-सात हजार रुपये भाव मिळतील या आशेने या वर्षी मोठ्या प्रमाणात खरिपात आतंरपीक म्हणून तुरीची पेरणी केली होती. परंतु, सध्या तुरीचे भाव घसरल्यामुळे शेतकऱ्यांची तूर बाजारात आल्यानंतर समाधानकारक भाव मिळतील की नाही, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.

अळ्यांचा प्रादुर्भाव वाढला
निम्मा नोव्हेंबर महिना उलटला असून अद्याप थंडीचा पत्ता नाही. ढगाळ, उबदार वातावरण असल्यामुळे तुरीवर मोठ्या प्रमाणात अळ्यांचा प्रादुर्भाव झाला आहे. या वर्षी शेतकऱ्यांच्या घरात कोणतेच पीक आल्यामुळे सर्व भिस्त तुरीच्या पिकावर आहे. त्यामुळे तुरीचे पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचा आटापिटा सुरू आहे.

झाडे तुटतात
^तुरी वरफायटोप्थेरा ब्लाइट नावाचा रोग आढळून आला आहे. यामुळे झाडांना गाठी येत असून, या गाठीपासून झाडे तुटून जात आहे. अनिल खर्चान, उपविभागीयकृषी अधिकारी.

हरभराही अडचणीत
अद्यापथंडीचा पत्ता नसल्यामुळे रब्बीतील प्रमुख पीक हरभराही अडचणीत आला आहे. वातावरणातील कमालीच्या उष्म्यामुळे हरभऱ्याचे पिकात आवश्यक असणारा जोमदारपणा दिसत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यातच जमिनीत ओलावा नसल्यामुळे हरभरा अडचणीत आहे. बागायत पट्ट्यातील हरभरा समाधानकारक असला तरी थंडी नसल्यामुळे त्यावरही उष्म्याचा परिणाम झाला आहे. खरिपातील तूट भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी सध्या रब्बीतील हरभरा, गहू आदी पिकांवर लक्ष केंद्रित केले आहे. परंतु, अनुकूल वातावरणनिर्मिती झाल्यास हरभऱ्यासह सर्व रब्बी पिकांना जबर फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.