आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना आतापर्यंत २५० कोटींची मदत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - पीक विमा योजनेचा सर्व शेतकऱ्यांना लाभ होणार असून, सन २०१४ मधील खरीप रब्बी पिकांच्या नुकसानीची जिल्ह्याला २५० कोटी रुपयांची मदत मिळाली. तसेच अवेळी पाऊस गारपिटीमुळे बाधित झालेल्या खातेदारांना २०१५ मधील नुकसानीची ११ कोटी ४२ लाख रुपयांची मदत शासनाने दिल्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी दिली. भारतीय प्रजासत्ताकाचा ६६ वा वर्धापन दिन स्थानिक जवाहरलाल नेहरू स्टेडियम येथे २६ जानेवारीला पार पडला.
तसेच १०१ कोटी रुपयांचे सावकारी कर्जदेखील माफ केले आहे. दोन लाख शेतकऱ्यांना अन्न सुरक्षेचा लाभ देऊन दोन रुपये किलो गहू, तीन रुपये किलो तांदूळ उपलब्ध करून देण्यात येत आहे. स्व. गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबवण्यात येणार असून, १० ते ७५ वर्षे वयोगटातील कोटी ३७ लाख शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. दोन लाख रुपयांचा हा विमा उतरवण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्र्यांनी दिली.

डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेमध्ये कोटी ७० लाख रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. श्यामाप्रसाद मुखर्जी अभियान, विशेष शिष्यवृत्ती योजना, समता सामाजिक न्याय वर्ष, महाआरोग्य अभियान, सीआरएफच्या माध्यमातून रस्तेविकास आदींची तपशीलवार माहिती पोटे यांनी दिली. उमेश दिघाडे, प्रमोद गवई यांनी १०० टक्के कर्जफेड केल्याबद्दल, राजा भुरभुरे अध्यक्ष नवीन जीवनज्योती रक्तदान समिती यांचा पालकमंत्र्यांनी सन्मान केला.

या वेळी स्वातंत्र्य संग्राम सैनिक, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते, विशेष पोलिस महानिरीक्षक संजीवकुमार सिंघल, पोलिस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, एसआरपीएफ समादेशक जी. बी. डाखोरे, पोलिस अधीक्षक लखमी गौतम, माजी राज्यमंत्री वसुधाताई देशमुख, आमदार यशोमती ठाकूर, महापौर रिना नंदा, जि. प. अध्यक्ष सतीश उईके, किरण महल्ले, मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार, मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पाटील, अधीक्षक अभियंता बनगीनवार, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी विनोद शिरभाते उपस्थित होते. मैदानावरील सर्व उपस्थित पथकाकडून पालकमंत्र्यांना मानवंदना देण्यात आली.

५०हजार शेततळे : जलयुक्तशिवार योजनेखाली २५३ गावांत ४,४१८ कामे पूर्ण झाली आहेत. या वर्षासाठी ही २९४ गावांची निवड करण्यात आली. १५ ऑगस्ट १५ ला नव्याने एक लाख विहिरी ५० हजार शेततळे निर्माण करण्याच्या कार्यक्रमांतर्गत ५२५० विहिरी पूर्ण केल्या जाणार आहेत.
या वेळी ध्वज दिन निधी संकलनात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी फ्ला. ले. रत्नाकार चरडे, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲड. अरुण शेळके यांचा गौरव करण्यात आला.
५००पांदण रस्ते मोकळे : पालकमंत्रीपांदण रस्तेविकास अभियानांतर्गत जिल्ह्यात आगामी काळात २,६०० पांदण रस्ते मोकळे करण्याचा मानस असून आतापर्यंत ५०० रस्ते मोकळे करण्यात आले आहे.

उद्योगासाठी एनएची गरज नाही : तसेचमेक इन महाराष्ट्र या अभियानात उद्योगासाठी जमीन खरेदी प्रक्रिया सुलभ केली आहे. कृषी आधारित उद्योगाकरिता एन. ए. करण्याची गरज संपुष्टात आली. यात २५ उद्योगांना परवानगी देण्यात आली.

५०० हेक्टरमध्ये टेक्सटाइल पार्क : जिल्ह्यात५०० हेक्टर जमिनीमध्ये टेक्सटाइल पार्क उभारण्यात आले असून, ७१३ कोटी रुपयांची गुंतवणूक आलेली आहे. संततुकाराम वनग्राम पुरस्कार : अचलपूरतालुक्यातील नया खेडा संयुक्त वनव्यवस्थापन समितीस या वर्षाचा संत तुकाराम वन ग्राम योजनेंतर्गत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल व्यवस्थापन समित्यांना ५१ हजार रुपयांचा प्रथम पुरस्कार तसेच खतीजापूर ता.अचलपूर यांना ३१ हजार रुपयांचा द्वितीय पुरस्कार स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

उत्कृष्ट महसूल अधिकारी
२०१५ या वर्षात शासकीय उपक्रम उत्कृष्टपणे राबवल्याबद्दल उपविभागीय अधिकारी प्रवीण ठाकरे, तहसीलदार सुरेश बगळे, प्रदीप पवार, जिल्हा पुरवठा अधिकारी डी. एस. वानखडे, पंकज चेडे, ए. बी. खोरगडे यांचा सत्कार करण्यात आला.

उत्कृष्ट सेवा पुरस्कार
राष्ट्रपती पोलिस पदक मिळाल्याबद्दल एसआरपी समादेशक जे. बी. डाखोरे, गडचिरोली येथे उत्कृष्ट सेवेचा राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्याबद्दल राजेंद्र होटे यांचा तसेच पोलिस क्रीडा पुरस्कार रमेश हलामी, प्रदीप लाहुडकर यांचा सन्मान झाला.

उत्कृष्ट कामगिरी
दीपस्तंभ स्वयंसाहाय्यता संस्था, जयंत सोनोने (अचलपूर), अक्षय मोहोड, कु.आदिती तेलंग, अविनाश घेवारे, श्याम भोकरे, जयंत दुबळे यांना क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल गौरवण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील व्यक्तींचाही गौरव करण्यात आला.