आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्याचे काम निकृष्ट, वरुड शहरातील रस्त्याच्या बांधकामाच्या दर्जाबाबत नागरिकांची आेरड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वरुड - शहरातील रस्त्याच्या विकासकामांना सुरुवात झाली आहे. परंतु, या कामांचा दर्जा निकृष्ट असून, त्यात भ्रष्टाचार होत असल्याची ओरड नागरिकांनी केली आहे. विशेष म्हणजे, बांधकाम करण्यात येणारा रस्ता नगरसेवक उमेश यावलकर यांच्या घरासमोरचा असल्याने शहरात चर्चेला उधाण आले आहे. रस्त्याच्या बांधकामाची चौकशी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

नगर परिषदेच्या विकासात्मक कामांसाठी शासनाकडून कोटी २५ लाख २६ हजार रुपये आले आहे. त्यातून शहरातील रस्त्यांच्या कामाला सुरुवात झाली आहे. त्यांपैकी २० लाख रुपये किमतीच्या ३३० मीटर लांबीचा रस्ता नगरसेवक उमेश यावलकर यांच्या घरापासून एलआयसी कार्यालयपर्यंतचा रस्ता करण्यात येणार असून, उर्वरित इतर रस्तेही होणार आहे. मात्र, नगरसेवकाच्या घरासमोरील ज्या रस्त्याचे काम करण्यात येत आहे, त्याचाच दर्जा खालावलेला आहे. संबंधित ठेकेदारांनी चार इंच जाडीच्या दगडांचा अर्ध्या फुटाचा थर करताच रस्त्याच्या कामाला सुरुवात केली आहे. परिणामी, रस्त्याचे काम निकृष्ट होत अाहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे. याच निधीतून याच परिसरात आतापर्यंत तीन वेळा रस्त्याचे काम करण्यात आले आहे. रस्त्याच्या बांधकामाची चौकशी क्वाॅलिटी कंट्रोल विभागाकडून करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. विरोधी पक्षही यावर चुप्पी साधून असल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सिमेंट काँक्रीटचा रस्ता तयार करताना प्रथम आवश्यक ते खोदकाम करून त्यामध्ये चार इंच जाडीच्या दगडांचा अर्धा फूट थर टाकून त्यावर थोडा मुरूम टाकून रोड रोलरने दबाई करावी लागते. नंतर त्यावर सिमेंट काँक्रिटीकरणाचा थर टाकण्यात येतो, परंतु, असे करताच ठेकेदारांनी चक्क डांबरीकरणाचा रस्ता पूर्ण खोदला त्यातून निघालेले मटेरियल पुन्हा त्यातच वापरण्यात आले. त्यावरच मुरुमाचा थर टाकण्यात आला अंदाजपत्रकानुसार कोणतेही मापदंड वापरण्यात आले नाही. त्यात चार इंच जाडीच्या दगडांच्या अर्धा फुटाच्या थराला बगल देण्यात आली असून, या प्रकरणात भ्रष्टाचार झाला अाहे. त्याची चौकशी करून संबंधित ठेकेदारासहित त्यावर सुपरव्हिजन करणाऱ्या अभियंत्यावर कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. सदर रस्ता हा माझ्या घरासमोरचा आहे. त्यामुळे हा रस्ता मी निकृष्ट दर्जाचा होऊ देणार नाही . सध्या मी बाहेरगावी आहे. गावात आल्यावर यावर चर्चा करून प्रकरण मिटवू, असे नगरसेवक उमेश यावलकर यांनी सांगितले.

निकृष्ट दर्जाचे काम होऊ देणार नाही
^मी सध्या बाहेरगावी अाहे. माझ्या प्रभागातील रस्ता असल्याने त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होऊ देणार नाही. आल्यावर याबाबत चौकशी करण्यात येईल. उमेशयावलकर, नगरसेवक.

संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे
^नियमानुसारकाम व्हायला हवे. विकासकामांसाठी शासन लाखो रुपये खर्च करते. मध्येच रस्ता उखडला गेल्यास सर्वसामान्यांचा घामाचा पैसा पाण्यात जातो. संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे. भाष्करधार्मिक, नागरिक.

भरणा करण्याची आवश्यकता नाही
^यावलकरयांच्या घरासमोरील रस्त्यावर पूर्वी डांबरीकरण करण्यात आले होते. सिमेंट काँक्रिटीकरणासाठी दोन्ही बाजूंची माती उकरून काढली असून, तेथे आता भरणा करण्याची आवश्यकता नाही. सिमेंटचे थर देऊन हा रस्ता पूर्ण होईल. रवीथोरात, नगराध्यक्ष.

नागरिकांच्या तक्रारींची चौकशी केली जाईल
^मी दोन दिवसांपासून अमरावतीलाच आहे. याविषयी ठेकेदाराला विचारले असता त्यांनी चार इंच जाडीच्या दगडांचा अर्धा फूट थर टाकला असल्याचे सांगितले. नागरिकांच्या जर याबाबत काही तक्रारी असतील, तर त्याची चौकशी करून त्यावर हा थर टाकण्यात येईल. पराग कठाळे, अभियंता.