आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खोदलेल्या नाल्यांमुळे अपघाताला निमंत्रण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिरजगाव कसबा - वळणाच्या रस्त्यावर होत असलेले अपघात पाहता, नागरिकांकडून होणाऱ्या गतिरोधकांच्या मागणीची जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घेतली. मात्र संबंधित विभागाकडून गतिरोधकांसाठी खोदलेल्या नाल्याच आता नागरिकांच्या जीवावर उठल्या आहेत. अपघाताला निमंत्रण देणाऱ्या या नाल्यांवर ताबडतोब गतिरोधक टाकल्यास आंदोलन करण्याचा इशारा पाळा शिरजगाव कसबा येथील नागरिकांनी दिला आहे.
शिरजगाव कसबा ते पाळा हे अंतर केवळ चार किमीचे आहे. हा रस्ता पूर्ण वळणाचा असल्याने यावर बरेच वेळा अपघात झाले आहेत. यासंदर्भात दिव्य मराठीने यापूर्वीच वृत्त प्रकाशित केले होते. झोपी गेलेल्या जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला जाग येऊन या मार्गावर गतिरोधक टाकण्याचा निर्णय घेतला. गतिरोधकासाठी रस्त्यावर नाल्या खोदण्यात आल्यात. मात्र, आजतागायत त्या तशाच कायम आहेत. खोदून ठेवलेल्या नाल्याच आता वाहतुकीसाठी त्रासदायक ठरत आहेत. या मार्गावर खासगी वाहतुकीचे प्रमाण अधिक आहे. कित्येकदा ऑटो नालीमध्ये अडकले आहेत. त्यामुळे ऑटोमध्ये तांत्रिक बिघाड होऊन ऑटोचालकांना आर्थिक भुर्दंडही सोसावा लागत आहे. या मार्गाने शेतकरी बैलबंडी नेऊ शकत नाही, तर अनोळखी व्यक्तींना नाल्या दिसत नसल्यामुळे अपघाताला आयतेच आमंत्रण मिळत आहे.

तत्काळ गतिरोधक टाकण्यात यावेत
वारंवार अपघात होत असल्याने गतिरोधकाची मागणी केली होती, परंतु गेल्या महिनाभरापासून या मार्गावर नाल्या खोदून ठेवल्या आहेत आहेत. त्यामुळे प्रवास करताना त्रास होतो. तत्काळ गतिरोधक टाकण्यात यावेत. संजयबदुकले, नागरिक.

आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो
प्रवासीऑटो चालवताना ऑटोचे समोरील टायर गतिरोधकासाठी खोदलेल्या नालीमध्ये फसत असल्याने ऑटोचे बेरिंग, ट्रँगल वारंवार तुटत आहे. त्यामुळे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. श्यामसभे, ऑटोचालक,पाळा

जि.प.च्या सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत गतिरोधकांसाठी या नाल्या खोदल्या आहेत, परंतु त्या कमी खाेलीच्या असल्याने येत्या दोन ते तीन दिवसांत गतिरोधक टाकण्याचे काम पूर्ण होईल. अनिलरंगारी, शाखाअभियंता, बांधकाम विभाग.

अपघाताला आयतेच निमंत्रण
गतिरोधकांसाठीखोदलेल्या नाल्यांमुळे अपघाताला आयतेच निमंत्रण मिळाले आहे. ऑटो, इतर वाहनांनी या मार्गे प्रवास करताना दमछाक होतेय, तर अनोळखी व्यक्तींना दिसत नसल्यामुळे अपघाताला सामोरे जाण्याची वेळ येते.

वळणदार मार्गावर अपघातांच्या घटना
पाळा-शिरजगावकसबा या वळणदार मार्गावर घडलेल्या अनेक अपघातांच्या घटनांमुळे नागरिकांनी या मार्गावर गतिरोधक टाकण्याची मागणी केली होती. याबाबत दिव्य मराठीने वृत्तही प्रकाशित केले होते.

बातम्या आणखी आहेत...