आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्यांची हालत ‘खस्ता’, वाहने चालवताना नागरिकांची कसरत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - स्मार्टसिटीकडे वाटचाल करणाऱ्या अमरावती शहराच्या सुमारे ५० टक्के भागात पक्के रस्तेच नाहीत, त्यामुळे बाहेरील भाग जसे तपोवन, यशोदानगर, प्रभू कॉलनी, महादेवखोरी, एमआयडीसी, बडनेरा या भागातील जनता रस्त्यासारख्या प्राथमिक सुविधांपासून वंचित आहे. या भागातील विकास अद्याप रस्त्यांच्या अभावीच पूर्ण होऊ शकला नाही. आजवर शहराच्या आतील भागाकडेच लक्ष देण्यात आल्यामुळे हा भाग दुर्लक्षित राहिला. त्यामुळे येथील नागरिक चांगलेच बेजार झाले आहेत.

पावसाळ्यात तर यांच्या समस्यांना रस्त्यांच्या अनुपलब्धतेमुळे क्लेशदायक वाटा फुटत असतात. जे रस्ते आहेत त्यावर खडी टाकण्यात आली असून, ती उखडली की, वाहनांचा तोल जाऊन पडणे, वाहन नादुरुस्त होणे, दुखापती, कपडे खराब होणे, कामाला वेळेवर पोहोचणे अशा अनेकानेक समस्या आहेत. दुचाकी वाहने पंक्चर होतात, त्यामुळे आता त्याची सवयच जडली आहे. हातपाय खरचटणे ही आता साधारण बाब झाली आहे. कारण वाहनाने जाता जाता ते कधी खड्ड्यातून उसळेल याचा नेम नाही. रात्री तर अशा मार्गांवरून जीवच मुठीत धरून जावे लागते.

महादेवखोरीपर्यंतचारस्ता लवकरच दुरुस्त : जुन्याबायपास रोडवरील यशोदानगरपासून प्रभू कॉलनी ते महादेवखोरीपर्यंतचा साधारणत: अर्धा ते पाऊण कि.मी. रस्ता उखडला आहे. हे १५ लाखांचे काम असून, यासाठी दोनदा नवििदाही काढण्यात आल्या आहेत. सध्या जेट पॅच मशीनद्वारे खड्डे बुजवण्यात आले आहेत. मात्र, डांबरीकरण पावसाळ्यात होणार नाही. दसऱ्याच्या कालावधीत काम पूर्ण करू, अशी माहिती या भागातील मनपाचे शाखा अभियंता मंगेश कडू यांनी दिली.

जीवन प्राधिकरण, एमएसईबी, रिलायन्सच्या कामांमुळे काही रस्ते खराब झाले आहेत. रस्ते उखडले की ते भरूनच मग पावसाळ्यानंतर डांबरीकरण करावे लागते. त्यामुळे दुरुस्तीसाठी उशीर होत आहे. जीवनसदार, मुख्य शहर अभियंता मनपा.

रस्त्यांमुळे अपघात होताहेत वाद
यशोदानगरते प्रभू कॉलनीतील नागरिकांनी येथील रस्ते अपघातांना निमंत्रण देत असून, जो भाग चांगला आहे, तेथूनच जाणे येणे करतात. त्यामुळे वाहनांचा धक्का लागून ते खाली पडतात. यामुळे मग वाद होतात. खड्ड्यांमुळे काही शाळकरी मुले जखमी झाले, तर काहींना किरकोळ दुखापत झाली. काहींची वाहने खराब झाली, अशी माहिती या भागातील रहविासी प्रा. प्रभाकर रामटेके यांनी दिली आहे.

सुवर्ण जयंती रस्ते, २०१० पासून प्रारंभ
१३व्या वित्त आयोगात सुवर्ण जयंती पथाअंतर्गत दोन रस्ते तयार केले. यासाठी शासनाकडून एकूण चार कोटी रुपयांचे अनुदान मिळाले. हे अनुदान पाच वर्षांत खर्च करायचे, असा नियम आहे. त्यामुळे सर्वप्रथम रेल्वे पूल हमालपुरा ते देवी सदन काँग्रेसनगर हा सुवर्ण जयंती पथ दोन कोटी रु. खर्चून तयार करण्यात आला. त्यानंतर राजापेठ रेल्वे क्रॉसिंग ते दस्तुरनगर हा सुवर्ण जयंती पथ पूर्ण करण्यात आला आहे.

शहरात ५० टक्के पक्के रस्तेच नाहीत
अमरावतीचेक्षेत्रफळ १२१.६५ चौ.कि.मी. आहे. मात्र, यापैकी ५० टक्के भाग सुविधांपासून वंचित आहे. यात रस्त्यांची आवश्यकता आहे. शहराबाहेरील भागातील नागरी वस्त्यांत ४२.५४ कि.मी. रस्त्यांची आवश्यकता आहे. या रस्त्यांचे खडीकरण करायचे असल्यास त्यासाठी २० कोटीची आवश्यकता आहे. या भागाच्या विकासाासाठी १०० कोटी रु. लागतील. यासंदर्भात प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे.

प्राधिकरणाचे काम पूर्ण झाल्याने पन्नालालनगरचा रस्ता अद्यापही अपूर्णच
जीवनप्राधिकरणाचे कामच पूर्ण झाले नसल्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागातील पन्नालालनगर या रस्त्याचे काम एका वर्षापासून अडून आहे. रस्त्याच्या मध्यभागी खड्डे केले जात असल्यामुळे त्यांना व्यवस्थित समतोल करण्यासाठी वेळ लागतो. त्यानंतरच काँक्रिटीकरण करणे शक्य होते अन्यथा रस्ता खचतो. निधी वाया जातो. जोपर्यंत या मार्गावरील जीवन प्राधिकरण, एमएसईबी, रिलायन्सचे केबल टाकण्याचे काम होत नाही तोपर्यंत रस्ता दुरुस्त होणार नाही. सध्या गिट्टी टाकल्याची माहिती शहर अभियंत्यांनी दिली.

यापैकी ज्या कामांच्या पूर्ततेसाठी जास्त रक्कम लागली ती इतर विकास निधीतून वापरली अन् जी रक्कम कमी लागली ती दुसऱ्या विकासकामांकडे वळती करण्यात आली.
बातम्या आणखी आहेत...