आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रश्नचिन्ह: आरओबी बनला मनपासाठी गुंतागुंतीचा मुद्दा, राजापेठ बाबत पुन्हा संभ्रम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- महापालिकेसाठीअत्यंत गुंतागुंतीचा मुद्दा बनलेल्या राजापेठ रेल्वे क्राॅसिंगवरील उड्डाणपुलाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आता या पुलाची चर्चा भूमी अधिग्रहणाशी जोडली जात आहे.

काहींच्या मते पाच आऊटलेट असलेल्या रेल्वे उड्डाणपुलाला बऱ्यापैकी जमीन लागणार असून, तिच्या अधिग्रहणाची कोणतीही प्रक्रिया मनपाने अद्याप सुरू केलेली नाही. त्यामुळे भविष्यात राजापेठचा आरओबी होणार की नाही, याबद्दल मोठे प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. जोपर्यंत जमिनीचे अधिग्रहण होत नाही, तोपर्यंत आरओबीचे प्रत्यक्ष काम कसे सुरू होईल, असा या चर्चेचा सूर आहे, तर दुसरीकडे पुलाला पाच आऊटलेट असले, तरी केवळ एकाच आऊटलेटच्या दिशेने जादा जमिनीची गरज आहे आणि तेवढी जमीन सहजतेने प्राप्त होणार आहे.

वाहतुकीची कोंडी करून शहराला अगदी दोन भागांत विभाजित करणाऱ्या राजापेठ रेल्वे क्राॅसिंगवर रेल्वे उड्डाणपूल तयार केला जावा, अशी अमरावतीकरांची फार जुनी मागणी आहे. तिचा स्वीकार झाल्यानंतर रेल्वे विभाग, राज्य शासन मनपाने मिळून उड्डाणपुलाचा प्रस्ताव तयार केला. गेल्या आठवड्यातच या प्रस्तावाला अनुसरून पाच निविदा भरल्या गेल्यात. त्यातील चाफेकर कन्स्ट्रक्शन कंपनीला मनपा प्रशासनाने तडजोडीसाठी (निगोशिएशन्स) बोलावलेही आहे. ते आल्यानंतर प्रत्यक्ष चर्चेसमयी त्यांच्यासमोर संपूर्ण चित्र ठेवले जाईल. त्यामध्ये जमीन अधिग्रहणाचा मुद्दाही समाविष्ट आहे. स्मार्ट सिटीसाठी मुंबईत तळ ठोकून असलेले आयुक्त चंद्रकांत गुडेवार परतल्यानंतर निगोशिएशन्स होणार असल्याचे मनपाच्या बांधकाम विभागाचे म्हणणे आहे. आगामी एक-दोन दिवसांतच याबाबतची वेळ निश्चित केली जाणार असून, संबंधित कंत्राटदाराशी अंतिम बोलणी केली जाणार आहे.

अत्यंत फायदेशीर योजना : राजापेठचारेल्वे उड्डाणपूल ही अत्यंत फायदेशीर योजना आहे. रेल्वे क्रासिंगमुळे विस्कळीत होणारी वाहतूक नियंत्रित करण्यासोबतच नागरिकांचा वेळ वाचवण्याचे मोठे काम आरओबीच्या बांधकामाने साध्य होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या दिशाभूल करणाऱ्या माहितीवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे.

मनपाच बांधणार उड्डाणपूल
राजापेठचारेल्वे उड्डाणपूल महानगरपालिकेच्या अभियंत्यांमार्फतच बांधला जाणार आहे. शहरात सध्या अस्तित्वात असलेले दोन उड्डाणपूल एमएसआरडीसीच्या मदतीने बांधले असले, तरी आरओबी मात्र मनपाच बांधेल. त्यासाठी आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ आपल्याकडे आहे. चंद्रकांतगुडेवार, आयुक्त, मनपा. अमरावती.ई.