आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

६० फुटांवरील खिडकीतून चोरटे दुकानात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- शहरातीलसराफा बाजारात असलेल्या एका तीन माळ्याच्या स्टील भांडे विक्रीच्या दुकानात चोरट्याने तिसऱ्या माळ्यावर जमिनीपासून अंदाजे ६० फूट उंचीवर असलेल्या खिडकीतून दुकानात प्रवेश केला. या वेळी चोरट्याने काउन्टरमधील रोख एक लाख पाच किलो वजनाचे चांदीचे शिक्के, असा जवळपास अडीच लाखांचा ऐवज लंपास केला. ही चोरी मंगळवारी पहाटेच्या सुमारास झाली.
शहरातील सराफा बाजारात असलेल्या महेंद्र जवाहरलाल जैन (५७, रा. पन्नालालनगर) यांच्या जैन स्टील या दुकानात अज्ञात चोरट्याने मंगळवारी पहाटेच्या सुमारास चोरी केली. सोमवारी रात्री १० वाजताच्या सुमारास जैन, त्यांचे बंधू राजेंद्र जैन दुकानातील कामगार दुकान बंद करून घरी गेले. ते मंगळवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास दुकानात आले. त्या वेळी तळमाळ्यावर असलेले काउन्टर तोडलेले होते. चोरट्यांनी तळमाळ्यावरील एका काउन्टरमधून जवळपास पाच किलो चांदीचे शिक्के चोरून नेले. हे शिक्के केवळ दिवाळीच्या वेळी पूजेसाठी काढण्यात येत होते. मागील ४० वर्षांपासून ते दुकानातच असल्याचे जैन यांनी सांगितले. दुकानातील पहिल्या माळ्यावरसुद्धा काउन्टर कॅबिन आहे.या काउन्टरमध्येही चोरट्यांनी सुरुंग लावून त्यामधील रोख लांबवली, याच वेळी कॅबिनचे लॉक तोडून यामध्ये असलेले कुलूपही तोडले. त्यानंतर दुसऱ्या माळ्यावरही चोरटे शिरले, मात्र त्या ठिकाणाहून त्यांनी काही चोरलेले नाही.

चोरट्यांचा शोध सुरू
जैनस्टीलमध्ये झालेल्या चोरी प्रकरणात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे. चोरट्यांचा आम्ही शोध सुरू केला आहे. चोरट्यांना पकडण्यासाठी आवश्यक माहिती घेण्याचे काम सुरू आहे. दिलीपपाटील, ठाणेदार, खोलापुरी गेट.

सीसीटीव्हीत चोर कैद
जैनस्टीलमध्ये सहा ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. चोरट्यांनी दुकानात वावर केला त्या वेळी सीसीटीव्ही कॅमेरांमध्ये दोघे कैद झाले चोरट्यांनी वाजून ४७ मिनिटांनी दुकानात प्रवेश केला, तर वाजून २७ मिनिटांपर्यंत ते दुकानात असल्याचे कॅमेऱ्यांच्या फुटेजमध्ये दिसून आले.
बातम्या आणखी आहेत...