आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात वर्षभर राबवणार सुरक्षित वाहतूक अभियान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - अमरावती शहरासह संपूर्ण देशात होणाऱ्या एकूण अपघातांपैकी ७२ टक्के अपघात हे वाहनचालकांच्या चुकीमुळे होतात. वाहन चालवतानाच वाहतूक नियमांचे काटेकोर पालन केल्यास अपघाताचे प्रमाण कमी होते, हे प्राप्त आकडेवारीवरून लक्षात येते. त्यामुळे फक्त १५ दिवसांचा रस्ता सुरक्षा पंधरवडा राबवून फायदा होणार नाही. त्यासाठी दर महिन्याला किमान एक दिवस याप्रमाणे वर्षभर जनजागृती करण्याचा निर्णय आरटीअो विभागाने घेतला आहे. आरटीओंची ही भूमिका मागील वर्षभरापासून अपघातमुक्तीसाठी ‘दै. दिव्य मराठी' राबवत असलेल्या अभियानाला साहाय्यभूत ठरणारी आहे.
वाहनचालकांनी सुरक्षित वाहन चालवल्यास अपघातांची संख्या कमी होते. मात्र, अनेक वाहनचालक वाहतूक नियमांपासून अनभिज्ञ असतात. अशा वाहनचालकांना शहर वाहतूक विभाग, आरटीओ यांच्याकडून दरवर्षी पंधरा दिवस चालणाऱ्या रस्ता सुरक्षा अभियानात ही माहिती मिळते. शासकीय विभागसुद्धा या पंधरा दिवसांत विशेष प्रयत्न करून जनजागृतीसाठी कार्यरत असतात. जनजागृतीसाठी पोस्टर, बॅनर्स, कॅलेंडर, चित्रप्रदर्शन अशा माध्यमांचा वापर केला जातो. मात्र, हा उपक्रम पंधरा दिवसच होतो. जनजागृती पंधरवड्यापुरतीच मर्यादित राहता, वर्षभर सुरू राहिल्यास वाहनचालकांसाठी फायद्याचे ठरणार आहे. या वर्षीच्या रस्ता सुरक्षा पंधरवड्यामध्ये आरटीआेकडून पोस्टर, बॅनर्स, कॅलेंडर, बैलबंडींना रिफ्लेक्टर लावणे अशा बाबी केल्याच आहे, शिवाय जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एक तसेच अमरावती शहरात मोठ्या आकाराचे फ्लेक्स लावण्यात आले आहेत. या मोठ्या फ्लेक्स सिग्नल किंवा अन्य दर्शनी भागात असल्यामुळे वाहनचालकांचे चटकन लक्ष वेधले जाईल, त्यावरील मजकूर हा वाहतूक नियमांची जाण करून देणारा आहे, ते अधिक प्रभावी ठरू शकते, असे मत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोडे यांनी व्यक्त केले आहे.

^सुरक्षित वाहतूकव्हावी, यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन केले जाते. रस्ता सुरक्षा पंधरवड्यात अधिक भर दिला जातो. मात्र, आगामी काळात दर महिन्याला किमान एकदा व्यापक जनजागृती केली जाईल. याशिवाय माेठे फ्लेक्ससुद्धा लावण्यात आले आहे. प्रश्नउत्तरांच्या कार्यक्रमाद्वारे विजेत्यांना हेल्मेटसुद्धा दिले जाणार आहे. विजय काठोडे, उपप्रादेशिकपरिवहन अधिकारी, अमरावती.
याच पंधरवड्यात आरटीआेकडून वाहनचालकांमध्ये वाहतूक नियमांविषयी जाणीव जागृती व्हावी यासाठी काही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना गाठून त्यांना वाहतूक नियमांसंदर्भात प्रश्न विचारायचे, त्या प्रश्नांची अचूक उत्तरे दिल्यास त्या विद्यार्थ्यांना हेल्मेट बक्षीस म्हणून दिले जाणार आहे. यातून वाहतूक नियमांची माहिती होईल, शिवाय हेल्मेटबाबत जनजागृती होईल, असे आरटीओच्या सूत्रांनी सांगितले.