आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काट्यांखाली झाकून ठेवली लाखांची वाळू, लवकरच होणार जप्त साठ्याचा लिलाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(महसूल पोलिसांनी कारवाई करून जप्त केलेला काट्यांखाली लपवलेले वाळुचा साठा)
अमरावती- शहरातील नागपुरी गेट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील झमझमनगरमध्ये शनिवारी (दि. १९) दुपारी १२ वाजताच्या सुमारास अमरावतीचे तहसीलदार सुरेश बगळे त्यांच्या पथकाने पोलिसांच्या मदतीने एक वाळुसाठा जप्त केला. जवळपास चार लाख रुपये किंमतीचा हा वाळूसाठा कोणालाही दिसू नये म्हणून चक्क काट्यांखाली झाकून ठेवला होता. आगामी दोन ते तीन दिवसांमध्ये या जप्त साठ्याचा लिलाव केला जाणार आहे.
शहरातील अनेक भागात अवैधपणे वाळूचा साठा केला जातो.मात्र यंदा तहसीलदार बगळे यांनी संपूर्ण शहरातच अवैध वाळू साठ्यांवर कारवाई करून ते जप्त करण्याची धडक मोहीम राबवली आहे. त्यांनी मागील दोन महिन्यात जवळपास १५ लाखांची अवैध वाळू जप्त केली होती.
त्यापैकी जवळपास आठ लाखांच्या वाळुंचा लिलावसुद्धा झाला आहे.
शनिवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास महसूल विभागाच्या पथकाने झमझमनगर भागातून जाणाऱ्या टॉवर लाईन परिसरातून हा वाळुचा अवैध साठा जप्त केला.याठिकाणी वाळू आहे, हे सहजासहजी कोणाच्याही लक्षात येऊ नये म्हणून काळूच्या िढगाऱ्यावर काटे पसरवण्यात आले होते. जवळपास ८० ब्रास असलेल्या या वाळुची बाजार भावानुसार लाख रुपये किंमत आहे. सदर वाळू रसूल खान हयात खान यांच्या मालकीचे असून जप्त केलेल्या या वाळूचा मंगळवारी किंवा बुधवारी लिलाव करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार सुरेश बगळे यांनी दिली.
अमरावती तहसील कार्यालयाने अवैध वाळू साठ्यांविरुद्ध हाती घेतलेल्या या धडक कारवाईमुळे शहरातील वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे.