आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिकस्त इमारतीत विद्यार्थी गिरवताहेत ज्ञानाचे धडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चांदूर रेल्वे - येथील नगर परिषदेंतर्गत येणाऱ्या पंडित जवाहरलाल नेहरू प्राथमिक शाळेच्या शिकस्त इमारतीत जवळपास पाचशे विद्यार्थी शिक्षणाचे धडे घेत आहेत. मात्र, नगर परिषद प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. याबाबत शाळा व्यवस्थापन समितीने पुढाकार घेऊन मुख्याधिकारी यांना निवेदनही दिले.

येथील नगर परिषदेंतर्गत एकूण पाच शाळा चालवण्यात येतात. त्यांपैकीच पंडित जवाहरलाल नेहरू प्राथमिक शाळेची इमारत एक आहे. या शाळेच्या इमारतीला जवळपास २५ वर्षे झाली आहेत. मात्र, गेल्या २५ वर्षांत या इमारतीकडे कुठलेही लक्ष नसल्यामुळे इमारत जागोजागी शिकस्त झाली आहे. इमारतीचे जवळपास प्रत्येक खोलीचे दरवाजे तुटले आहेत, तर कित्येक खिडक्यांना काचा नाहीत. या इमारतीवर आजपर्यंत नगर परिषद प्रशासनाच्या वतीने कुठलीही डागडुजी करण्यात आली नाही किंवा कुठल्याही प्रकारचा खर्च केला नाही, असे इमारतीच्या एकंदर स्थितीवरून दिसून येते.

या शिकस्त झालेल्या इमारतीत जवळपास पाचशे विद्यार्थी जीव मुठीत घेऊन ज्ञानार्जन करत आहेत. अशा बिकट परिस्थितीची प्रशासनाला जाणीव नसणे, हे एक कोडेच आहे. शाळेच्या शिकस्त झालेल्या इमारतीबाबत प्रशासनाचे निद्रिस्त धोरण पाहून शेवटी शाळा व्यवस्थापन समितीनेच याबाबत पुढाकार घेतला. समितीचे अध्यक्ष केशवराव वंजारी यांनी मुख्याधिकारी यांना एक निवेदन दिले. लवकरात लवकर इमारतीच्या दुरुस्तीचे काम करावे, असे निवेदनात नमूद केले आहे. मात्र, तक्रार आली तरच कारवाई करू, असे मुख्याधिकारी म्हणतात. यावरून प्रशासन विद्यार्थ्यांप्रति किती उदासीन आहे, हे दिसून येते.

पाहणी करून कारवाई करू
आतापर्यंतमाझ्याकडे या प्रकरणाबाबत माझ्याकडे आतापर्यंत एकही तक्रार आली नाही. मी प्रत्यक्ष पाहणी करून पुढील कारवाई करेन. मंगेशखवले, मुख्याधिकारी.

शाळा समितीचा पुढाकार
शाळेचीसध्याची अवस्था पाहता विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने शेवटी शाळा व्यवस्थापन समितीने पुढाकार घेत मुख्याधिकारी मंगेश खवले यांना शाळेच्या इमारतीच्या दुरुस्तीबाबत निवेदन दिले आहे.

इमारतीची दुरवस्था
२५ वर्षांपासून परिसरातील विद्यार्थी या इमारतीत ज्ञानार्जन करत आहेत. या इमारतीचे दरवाजे तुटले आहेत, तर खिडक्यांच्या काचाही फुटलेल्या आहेत. ठिकठिकाणी इमारतीचे प्लास्टरही निघाले आहे.
बातम्या आणखी आहेत...