अमरावती - विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक पायाभूत प्रगतीसाठी आता शिक्षकांना प्रगत महाराष्ट्र अभियानाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या ३०० शाळांमधील शिक्षकांना हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणाचे डिसेंबर महिन्यात आयोजन करण्याबाबत शिक्षण विभागाकडून नियोजन केले जात आहे. सहा दिवस चालणाऱ्या प्रशिक्षणामध्ये तब्बल ४०० शिक्षकांना प्रगत केले जाणार आहे. एकही विद्यार्थी अप्रगत राहणार नाही याची जबाबदारी शिक्षकांवर राहणार आहे.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाचा पाया पक्का करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’ हा गुणवत्ता विकास कार्यक्रम राबवला जात आहे. या अभियानांतर्गत सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांची पायाभूत चाचणीदेखील घेण्यात आली. या चाचणीनुसार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीची माहिती सरल प्रणालीमध्ये भरली जात आहे. या माहितीच्या आधारे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. असे असले तरी जिल्ह्यातील शिक्षकांना या अभियानाच्या दृष्टीने प्रशिक्षित करण्याचे नियोजन पूर्वीच करण्यात आले आहे. जिल्ह्यातील २०० शाळेतील सर्व विद्यार्थी प्रगत करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार २०० शाळेतील शिक्षक (१ भाषा गणित) असे जिल्ह्यातील ४०० शिक्षकांना ‘प्रगत’ करण्याच्या दृष्टीने प्रशिक्षित केले जाणार आहे. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती खुंटली असल्याची माहिती सर्वेक्षणानंतर समोर आली होती. देशातील शाळांच्या तुलनेत राज्यातील पाचवीच्या ४६.५ टक्के विद्यार्थ्यांना दुसरीच्या धड्यांचे वाचन करता येत नाही, उर्वरितपान
जिल्हा परिषदेच्या शाळानिहाय श्रेणी
उपक्रमशाळा
गुणवत्ता विकास १६०२ २४ ३७८ ११६७ ३२
समृद्ध शाळा १६०२ ५६५ ८१७ २२०
मेळघाटामध्ये कृतिशील अध्ययन
मेळघाटातील धारणी चिखलदरा या दोन तालुक्यात कृतिशील अध्ययन हा उपक्रम आरंभ केल्या जाणार आहे. एका तालुक्यातील १५ याप्रमाणे दोन्ही तालुक्यातील एकूण ३० शाळांमध्ये हा कृतिशील अध्ययन उपक्रम आरंभ केल्या जाणार आहे. एकही विद्यार्थी अप्रगत राहू नये, हाच या अभियानामागील उद्देश असल्याचे शिक्षण विभागाकडून देखील स्पष्ट करण्यात आले.
एकूण जि. प. प्राथमिक शिक्षक
पद मंजूर कार्यरत
मुख्याध्यापक २७७ ३७७
सहा. शिक्षक ४५४१ ५४५३
पदवीधर शि. १५५५ ३८२
एकूण ६३७३ ६२१२
अंशकालीन नि. १२६
पुढे काय ?
गुणवत्तेच्या दृष्टीने जिल्हा परिषदेच्या एकूण १६०२ पैकी केवळ २४ शाळा श्रेणीत आहे. श्रेणीत असलेल्या शाळांची संख्या अधिक आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’ उपक्रमातून यामध्ये सुधार होणे अपेक्षित आहे.
शाळेत एकही अप्रगत विद्यार्थी राहू नये
^शाळेतील एकही विद्यार्थी अप्रगत राहू नये म्हणून हे प्रशिक्षण घेतले जाणार आहे. प्रत्येक केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी तसेच शिक्षणाधिकाऱ्यांनी देखील प्रत्येकी एक शाळा गुणवत्तेच्या निकषावर सुधारणा करण्यासाठी दत्तक घेतली आहे.तालुक्यातून दोन शाळांना आयएसओ मानांकन मिळावे असा निर्धार आहे. पंडित पंडागळे, उपशिक्षणाधिकारी(प्राथमिक) जिल्हा परिषद,अमरावती.
उपक्रमात १०० शाळा
विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती व्हावी म्हणून जिल्ह्यातील १०० शाळांमध्ये नावीन्यपूर्ण उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमातून प्रत्येक शाळेला १७ हजार ५०० रुपयांचे अनुदान दिले जात आहे. या निधीचा वापर करीत शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न होणार आहे. विविध साधनांचा वापर करीत आनंददायी शिक्षण देत किमान १०० शाळा नावीन्यपूर्ण उपक्रमातून प्रगत करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
२०० शाळा दत्तक
शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ व्हावी म्हणून जिल्हा परिषदेच्या २०० शाळा दत्तक घेण्यात आल्या आहेत. शिवाय शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुखांनी देखील प्रत्येकी एक शाळा दत्तक घेतली आहे. शिवाय १२५ शाळांमध्ये ई-लर्निंग प्रकल्प आरंभ करण्यात आला आहे, त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण मिळत आहे.