आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बचत गटाच्या महिलांतर्फे सीईआेंना झुणका भाकर भेट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- शहरातीलवडाळी येथील ओम साई बचत गटाच्या महिलांनी जिल्हा परिषदेच्या आवारातील उपाहारगृह चालवण्यासाठी देण्याची मागणी यापूर्वीच जिल्हा परिषदेकडे केली आहे. अद्यापही ही मागणी मान्य झाल्यामुळे या महिलांनी मंगळवारी (दि. १४) जिल्हा परिषदेच्या आवारात चूल पेटवून झुणका भाकर बनवली. ही झुणका भाकर मुख्य कार्यपालन अधिकारी सुनील पाटील यांनाही दिली. त्यांनी ती स्वीकारली. याच वेळी मात्र अनेक अधिकाऱ्यांनी झुणका भाकर घेण्यास नकार दिला.

जिल्हा परिषदेच्या आवारात मागील अनेक वर्षांपासून सुरू असलेले उपाहारगृह चालवण्यास देण्यात यावे, अशी मागणी वडाळीच्या ओम साई महिला बचत गटाच्या महिलांनी मागील सात महिन्यांपासून केली आहे. याच मागणीसाठी महिलांनी धरणे आंदोलन उपोषणसुद्धा केले.
या उपोषणादरम्यान तीन महिलांची प्रकृती अस्वस्थ झाली होती. त्या वेळी जुलैपर्यंत यासंदर्भात निर्णय देऊ, असे आश्वासन महिलांना देण्यात आले होते. मात्र, जुलैपर्यंत तोडगा निघाल्यामुळे मंगळवारी (दि. १४) या महिलांनी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागासमोर असलेल्या पार्किंगच्या जागेत या महिलांनी झोपडी उभारून चूल पेटवली.

याच ठिकाणी त्यांनी झुणका भाकर तयार केली. त्यानंतर झुणका भाकर घेऊन या महिला जिल्हा परिषदेमधील अनेक अधिकाऱ्यांकडे गेले. मात्र, अनेकांनी झुणका भाकर घेतली नाही. याच वेळी बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता पुरुषोत्तम भागवत यांच्या कक्षात जाऊन झुणका भाकर देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी नकार दिला, त्या वेळी महिला संतप्त झाल्या. या वेळी महिलांना आवर घालताना महिला पोलिसांसोबत धक्काबुक्की झाली आहे. त्यानंतर मुख्य कार्यपालन अधिकारी सुनील पाटील यांच्या कक्षात जाऊन त्यांना झुणका भाकर दिली. त्या वेळी पाटील यांनी महिलांचा सन्मान करून झुणका भाकरेचा स्वीकार केला.

मागील सात महिन्यांपासून आम्ही केलेल्या मागणीवर अजूनही जिल्हा परिषदेकडून निर्णय झालेला नाही. आपण ते उपाहारगृह आम्हाला चालवण्यासाठी देण्याची मागणी त्यांनी केली. या प्रकरणातून न्यायालयाचा निर्णय येणे बाकी आहे. न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर आपण या विषयावर चर्चा करू. तसेच आपल्यासोबतच जिल्ह्यातील इतर ठिकाणी देण्यासंदर्भातही निर्णय घ्यायचा आहे, असेही पाटील यांनी महिलांशी चर्चा करताना सांगितले. या वेळी अरुणा कावरे, माेनिका आंबेकर, भारती गावंडे, वैशाली गाडरे, ललिता आंबेकर, सोनू सोळंके, ममता चव्हाण, गायत्री मुंजाळे यांच्यासह अन्य महिला उपस्थित होत्या.

आेम साई बचत गटाच्या महिलांनी जि.प. च्या आवारातच चूल मांडून झुनका भाकरी बनवली.
जिल्हा परिषदेचे उपाहारगृह महिला बचत गटाला द्यावे, या मागणीसाठी अाेम साई बचत गटातील महिलांनी झुनका भाकरी अांदाेलन केले. मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पाटील यांना झुनका भाकर भेट दिली.
बातम्या आणखी आहेत...