आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेख जफरला जामीन, अकोल्यात नेऊन सोडले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहरातून दोन वर्षांसाठी तडीपार असलेले अमरावतीचे उपमहापौर शेख जफरला शहर कोतवालीचे ठाणेदार दिलीप पाटील यांनी बुधवारी (दि. २३) अटक केली होती. गुरुवारी (दि. २४) जफरला न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने त्याला जामीन दिला. याच वेळी जफरने दररोज अकोल्याच्या रामदासपेठ पोलिस ठाण्यात हजेरी लावावी, असे आदेशही दिले आहे.

उपमहापौर शेख जफर बुधवारी नमुना परिसरात आढळून आला होता. तडीपार काळात शहरात येण्यासाठी आवश्यक असलेली परवानगी पोलिसांनी त्याला मागितली होती. मात्र, त्याच्याकडे परवानगी नव्हती. त्यामुळेच ठाणेदार दिलीप पाटील यांनी त्याला ताब्यात घेऊन दुचाकीनेच शहरातून गाडगेनगर ठाण्यात नेले होते. या ठिकाणी पोलिस आयुक्त व्हटकर यांच्यासह पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी पोहोचले होते. रात्रभर कोठडीत ठेवल्यानंतर गुरुवारी पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला जामीन दिला आहे. त्यामुळे पोलिसांच्या पथकाने गुरुवारी सायंकाळी अकोल्यात जाऊन सोडून दिले. तडीपार काळात जफर अकोल्यात राहणार आहे.

जामीन मिळाला, दररोज हजेरी लावण्याचे आदेश
शेख जफरला गुरुवारी आम्ही न्यायालयापुढे हजर केले. न्यायालयाने जफरचा जामीन मंजूर केला. मात्र, याच वेळी त्याला अकोल्याच्या रामदासपेठ ठाण्यात दररोज हजेरी लावण्याचे आदेश दिले. त्यामुळे गुरुवारी सायंकाळी पोलिस पथक त्याला अकोल्यात सोडण्यासाठी गेले आहे. दिलीप पाटील, ठाणेदार, शहर कोतवाली.