आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीकांत थेटे, गणेशच्या योगमुद्रा ठरल्या अव्वल, विभागीय स्पर्धेकरिता पात्रता केली सिद्ध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती; शिवाजी हायस्कूल खारतळेगांवच्या श्रीकांत थेटे सावनेरच्या वामन महाराज विद्यालयातील गणेश गावंडेच्या अप्रतिम योगमुद्रांनी जिल्हास्तरीय १९ वर्षांखालील ग्रामीण मुलांच्या गटात अनुक्रमे प्रथम द्वितीय क्रमांकांवर ठसा उमटवला. मोर्शी येथील भारतीय महाविद्यालयाच्या अमोल दारोकारने तृतीय क्रमांकाचे पारिताेषिक पटकावले. प्रथम पाच क्रमांकावर येणारे योगपटू विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.
क्रीडा युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा परिषदेच्या अधिपत्याखाली तसेच जिल्हा क्रीडा उपसंचालक डाॅ. जयप्रकाश दुबळे, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांच्या मार्गदर्शनात आणि क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे तसेच जिल्हा योग संघटनेच्या तांत्रिक संयोजनात विभागीय क्रीडा संकुलात झालेल्या या स्पर्धेत मुलांच्या १७ वर्षांखालील ग्रामीण गटात आदर्श हायस्कूल, दर्यापूरच्या ओमप्रकाश कातडेने स्पर्धेत आवश्यक सर्वच आसने अगदी सुबकरित्या सादर करून अव्वल स्थान बळकावले.

चमक अचलपूरच्या समता विद्यालयातील आकाश नांदणेने द्वितीय क्रमांकावर ताबा मिळवला तर तळवेळ येथील शंकर विद्यालयाच्या चैतन्य कोल्हेने तृतीय क्रमांक पटकावला.
याच वयोगटात वामन महाराज विद्यालय सावनेरच्या सचिन राऊतला प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यानंतरही चतुर्थ क्रमांकावर समाधान मानावे लागले. मोर्शी येथील शिवाजी हायस्कूलच्या दीपक घाटोळने पाचवा क्रमांक पटकावला. श्री वामन महाराज विद्यालय, सावनेरचे गणेश गावंडे सचिन राऊत सलग सहा वर्षांपासून योगासन स्पर्धेत सहभागी होऊन यश संपादन करीत अाहेत. शारीरिक शिक्षक नरेंद्र बोंडे यांच्या मार्गदर्शनात या योगपटूंनी विद्यालयाची परंपरा कायम ठेवल्याबद्दल मुख्याध्यापक श्रीराव यांच्यासह विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
जन्मेजय,यश, शंतनू, हुसेनला जेतपद : १७वर्षांखालील मुलांच्या ऱ्हीदमिक योगासन प्रकारात इंडो पब्लिक स्कूल, अमरावतीच्या जन्मेजय मुगलने लयबद्ध योगासनं सादर करून तर आर्टिस्टिक प्रकारात आदर्श हायस्कूल, दर्यापूरच्या शंतनू टेकाडेने अचूक योगसनांसह जेतेपद पटकावले. मुलांच्या १४ वर्षांखालील विभागात आर्टिस्टिक प्रकारात आदर्श हायस्कूल, दर्यापूरच्या यश राठीने तर ऱ्हीदमिक प्रकारात इंडो पब्लिक स्कूलच्या हुसेन जामनगरवालाने विजेतेपद मिळवले.

आणखीअचूक कामगिरी अपेक्षित : मुलांच्या१९ वर्षांखालील गटात बडनेरा येथील आरडीआयकेच्या ऋषीकेश चकुलेने लवचिक शरीराद्वारे अचूक देखण्या योगमुद्रा सादर करून प्रथम क्रमांक अर्जित केला. ब्रिजलाल बियाणी महाविद्यालयाच्या तुषार कुकडेनेही योगांचे उत्कृष्ट सादरीकरण करून दुसरा क्रमांक बळकावला. त्याचप्रमाणे शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान महाविद्यालयाच्या प्रज्वल भनकने दमदार कामगिरीसह तिसरे स्थान पटकावले. या स्पर्धेत अव्वल योगपटूंनी विभागीय योगासन स्पर्धेसाठी पात्रता मिळवली.

दर्यापूरचा गौरव सगने विजेता
मुलांच्या१४ वर्षांखालील योगासनांमध्ये आदर्श हायस्कूल, दर्यापूरच्या गौरव सगनेने देखण्या योगासनांचे प्रदर्शन करून अजिंक्यपद पटकावले. त्याचाच शालेय सहकारी वेदांत पिंजरकरने तुल्यबळ कामगिरी करून उपविजेतेपद बळकावले. इंडो पब्लिक स्कूल, अमरावतीच्या क्षितीज धाकेने तृतीय क्रमांक पटकावला. आॅरेंज सिटी काॅन्व्हेंट वरुडच्या यश कराळेने चौथे इंडो पब्लिकच्या केवल राऊतने पाचवे स्थान पटकाकवले.