आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘स्मार्ट सिटी’साठी मनपा मैदानामध्ये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - अमरावतीला ‘स्मार्ट सिटी’ हे नामाभिधान मिळवून देण्यासाठी मनपाने कंबर कसली असून, तसा प्रस्ताव शुक्रवारीच शासनाला सादर केला आहे. या प्रस्तावात मनपाचे एकूण ‘व्हिजन’ प्रतिबिंबीत झाले असून, आतापर्यंत झालेली तयारी भविष्यात केल्या जाणाऱ्या सर्व उपाययोजना स्पष्ट झाल्या आहेत.
गेल्या महिन्यात दिल्लीत झालेल्या कार्यशाळेतून परतल्यानंतरच महापौर चरणजितकौर नंदा आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी ‘स्मार्ट सिटी’च्या स्पर्धेत भाग घेण्याचा संकल्प सोडला होता. त्यानुसार ११ पानांचा मुद्देनिहाय प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. यामध्ये स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छता राखण्यासाठी शौचालयांची बांधणी, नागरिकांच्या तक्रारींची ऑनलाइन सोडवणूक, डिजिटल पद्धतीच्या मासिक पत्रिकेचे प्रकाशन, सेवा देण्यास िवलंब झाल्यास स्वत:वर दंड लावून घेण्याची हमी, अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनाची अदायगी, पुरेशा पाण्याची उपलब्धता, करवसुलीची स्थिती आदी मुद्द्यांचा समावेश आहे.


बातम्या आणखी आहेत...