आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘स्मार्ट सिटी’ निघाली ‘दिल्लीवारी’ प्रवासाला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - स्मार्टसिटीच्या दृष्टीने सुरू असलेला अमरावती शहराचा प्रवास अंतिम टप्प्यात पोहोचला असून उद्या, बुधवारी त्याबाबत निघाले असून, मंगळवारी सकाळी ते नागपूरहून विमानाने दिल्लीत पोहोचणार आहेत. याबाबतचा अहवाल केंद्रीय नगरविकास मंत्रालयात सादर केला जाणार आहे. त्यासाठी मनपाचे दूत म्हणून उपायुक्त चंदन पाटील अमरावतीहून रवाना झाले आहेत.
स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी देशभरातून शंभर शहरांची निवड करण्यात आली असून, पुढील वर्षीच्या प्रजासत्ताकदनी पहिल्या २० शहरांची घोषणा केली जाणार आहे. या वीस शहरांमध्ये अमरावतीचा समावेश असेल, असे मनपा प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यासाठी मंगळवारचे सादरीकरण अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. केंद्रीय नगरविकास मंत्रालयाच्या अवर सचिवांकडे सादर होणारा हा अहवाल पाच प्रतींमध्ये असेल. यांतील प्रत्येक प्रत ही ९८ पानांची असून, त्यामध्ये पाच वर्षांत या शहराचा प्रवास कसा-कसा पुढे जाईल, याची सविस्तर मांडणी करण्यात आली आहे.

स्मार्ट सिटीच्या दृष्टीने सुरू असलेली अमरावतीची धावपळ गेल्या दोन महिन्यांपूर्वी सुरू झाली होती. आयुक्त चंद्रकांत गुडेवार मनपाचे सर्व पदाधिकारी यांनी हातात-हात घालून काम केल्यामुळे हा प्रस्ताव पूर्णत्वास जाऊ शकला. उद्याच्या सादरीकरणानंतर या सर्वांच्या प्रयत्नांना मोठे यश आल्याचे स्पष्ट होणार आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत मनपाला दरवर्षी २०० याप्रमाणे पाच वर्षांत हजार कोटी रुपये मिळणार असून, त्यांतील काही रक्कम महादेवखोरीच्या पहाडपट्टीत आकाराला येणाऱ्या आदर्श वसाहतीसाठी (ग्रीन टाऊनशिप), तर उर्वरित रक्कम शहरातील पायाभूत अत्याधुनिक सुविधांसाठी खर्च केली जाणार आहे.

पहिल्या वीसमध्ये हमखास येणार
^स्मार्टसिटीच्या दृष्टीने अमरावतीची सुरू असलेली वाटचाल अत्यंत चांगल्याप्रकारे पुढे जात आहे. महसूल विभागाकडून यासाठी पूर्ण सहकार्य केले जात आहे. महादेवखोरीची जागा देण्यासाठीचे सर्व सोपस्कार मी पूर्ण केले आहेत. महापालिका म्हणेल त्यापद्धतीने काम करण्याची माझी पूर्ण तयारी आहे. किरण गित्ते, जिल्हाधिकारी,अमरावती.

उच्चस्तरीय समितीकडेही हैदराबादेत सादरीकरण
^स्मार्टसिटी प्रस्तावासाठी राज्य शासनाने एक उच्चस्तरीय समिती गठित केली आहे. राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रीय यांच्या नेतृत्वातील या समितीने शुक्रवारीच नागपूरच्या हैदराबाद हाऊसमध्ये या प्रस्तावाची पाहणी केली. पाहणीअंती त्याच दिवशी या प्रस्तावाची दिल्लीसाठी शिफारस करण्यात आली. चंद्रकांत गुडेवार, आयुक्त,मनपा, अमरावती.
बातम्या आणखी आहेत...