आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्याने मित्राच्या मदतीने पत्नीला विकले 5 लाखांत; ग्राहकासोबत लग्नही लावून दिले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- मोर्शी तालुक्यातील खानापूर येथील एकाने पैशासाठी चक्क पत्नीलाच विकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी कृष्ण सुरेश मोहने याने मित्र आणि महिलेच्या मदतीने पत्नीला 5 लाख रुपयांत राजकोट येथे विकले. इतकेच नाही तर खरेदीदारासोबत तिचे लग्नही लावून दिले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीसह त्याचा मित्र आणि संबंधित महिलेला अटक केली आहे.

मिळालेली माहिती अशी की, आरोपी कृष्णा सुरेश मोहने याचे गावातीलच 20 वर्षीय तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. जानेवारी 2016 मध्ये दोघांनी आंतरजातीय विवाह केला होता. मोलमजुरी करून दोघे आपला उदरनिर्वाह भागवत होते. त्यात कृष्णाची पत्नी गरोदर राहिली. आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्यामुळे त्याने पत्नीला अमरावती आणून जबरदस्तीने तिचा गर्भपात करून घेतला. नंतर पैशाच्या लालसेने त्याने पत्नीलाच विकण्याचे ठरवले. राजकोटमधील बिरेन नामक व्यक्तीला कृष्णाने 5 लाख रुपयांत पत्नीला विकले.  

राजकोटमध्ये एक महिना थांबली पीडिता...
कृष्णाने पत्नीला बिरेनसोबत वाटे लावले. बिरेन तिला राजकोट येथे घेऊन गेला. पीडिता त्याच्या घरी तब्बल एक महिना थांबली. त्यादरम्यान बिरेन याने तिच्यावर अनेकदा जबरदस्ती केली. नंतर ती 21 जुलैला राजकोटहून पुन्हा अमरावती परत आली. मोर्शी पोलिस ठाण्यात पतीविरुद्ध तक्रार दाखल केली.
बातम्या आणखी आहेत...