आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Soon Counseling And The Information Center For Farmers

शेतकऱ्यांसाठी लवकरच समुपदेशन, माहिती केंद्र

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परतवाडा - सततची नापिकी कर्जबाजारीपणामुळे हवालदिल झालेल्या प्रसंगी आत्महत्येसारख्या टोकाचा निर्णय घेणाऱ्या शेतकऱ्यांचे समुपदेशन करून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी अचलपूर कृउबासने माहिती केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या माहिती केंद्रातून शेतकऱ्यांना विद्युत्त विभाग बँकिंग, कृषी आदी विभागातील समस्यांचा पाठपुरावा करण्यासोबतच शेतकऱ्यांच्या मदतीला हे माहिती केंद्र तत्पर राहील. काही अडचणी आल्यास संबंधित विभागाला पत्र देऊन सकारात्मक पद्धतीने काम करण्यासाठी आग्रह धरेल. ही संकल्पना प्रत्यक्षात अमलात आली, तर जिल्ह्यातच नव्हे, संपूर्ण राज्यात शेतकऱ्यांसाठी वेगळा प्रयत्न करणारी अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समिती पहिली संस्था ठरणार आहे.

नापिकीमुळे तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. पिकाचे नुकसान, दुष्काळी परिस्थिती आणि प्रशासनाचे दफ्तरदिरंगाई धोरण यामुळे शेतकरी पूर्णत: खचला असून, शेतकऱ्याला जीवन जगणे कठीण झाले आहे. अशा वेळी अचलपूर कृउबासच्या वतीने शेतकऱ्यांसाठी समुपदेशन माहिती केंद्र सुरू करण्यात येणार आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतातील पीक नष्ट झाल्याने गंभीर परिस्थिती ओढवली आहे. शेतीचा खर्च, आजारपणाचा खर्च भागवता येईल एवढा पैसाही सद्य:स्थितीत शेतकऱ्याच्या हाती नाही. लागवडीला लावलेला खर्च दुष्काळामुळे शेतकऱ्याला मिळणार नसले, तर दुसरीकडे बँकेचे कर्ज मिळाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना योग्यप्रकारे शेतीही करता अाली नाही. दुष्काळातून वाचलेल्या पिकाला योग्य भाव नाही. वीज नसल्याने पाण्याअभावी पीकदेखील हातातून जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांना समुपदेशन करून आवश्यक त्या ठिकाणी मदत करण्याकरिता बाजार समितीत माहिती केंद्र सुरू करण्याचा मानस कृउबासचे सभापती अजय टवलारकर यांनी व्यक्त केला आहे.

शेतकऱ्यांनी व्हावे खंबीर
अचलपूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी दुर्दैवी निर्णय घेत आत्महत्या केली. यावर आत्महत्या हा पर्याय नाही. शेतकऱ्यांनी समस्या निराकरणासाठी खंबीर व्हावे. यातून योग्य तो मार्ग काढला जाऊ शकतो. कोणतेही आत्मघातकी पाऊल त्यांनी उचलू नये, असे आवाहन अजय पाटील यांनी केले आहे.
^शेतकऱ्यांना विविध योजनांसाठी कर्जासाठी चकरा माराव्या लागतात. त्यामध्ये पिळवणूकही होते. याला आळा बसावा म्हणून संचालक मंडळ निश्चितच शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेणार आहे. त्याचा शेतकऱ्यांना लाभ होईल. मनोहरजाधव, संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती.

^आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्यासाठी बाजार समिती सकारात्मक असून, संचालक मंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव ठेवून त्यासाठी निर्णय घेण्याचे आवाहन करेल. निर्णय झाल्यास शेतकरी कुटुंबाला मदत देऊ. अजय पाटील टवलारकर, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती.