आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

३२ एकर सोयाबीनवर फिरवला अखेर ट्रॅक्टर, शेंगाच लागल्या नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परतवाडा- अत्यल्प पाऊस मोठ्या प्रमाणात झालेल्या किडीच्या प्रादुर्भावामुळे नापिकीचा धोका दुष्काळी परिस्थितीच्या सावटामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. उसनवारी करून सोयाबीनला जगवण्याचा प्रयत्न केला, परंतु रोग पाण्याचा ताण सहन झाल्याने सोयाबीनला शेंगाच लागल्या नाहीत. त्यामुळे अचलपूर तालुक्यातील कोल्हा आणि असदपूर येथील दोन शेतकऱ्यांना ऐन पोळ्याच्या दिवशी अनुक्रमे २० १२ एकरातील सोयाबीनवर ट्रॅक्टर फिरवण्याचा दुर्दैवी निर्णय घ्यावा लागला.
कोल्हा येथील सुनील जनार्दन उल्हे यांनी २० एकरातील सोयाबीन पिकावर ट्रॅक्टर फिरवला, तर असदपूर येथील शेतकरी संजय देऊळकर यांनीही १२ एकर सोयाबीन मोडण्याचा निर्णय घेतला. यावरून शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती लक्षात येते.
यंदा शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून आेळखल्या जाणाऱ्या सोयाबीनची मोठ्या मेहनतीने पेरणी केली. भविष्यात सोयाबीनचे पीक उभे राहून घरात धनलक्ष्मी नांदेल आणि नापिकी निसर्गाच्या लहरीपणामुळे पाचवीला पुजलेली संकटे काही प्रमाणात का होईना कमी होतील, या आशेने शेतकऱ्यांनी मोठा खर्च केला. पदरमोड करत कर्ज घेऊन शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली.

उसनवारी करून सोयाबीनला जगवण्याचा प्रयत्न केला, परंतु या पिकावर आलेला रोग पाण्याचा ताण सहन झाल्याने सोयाबीनला शेंगाच आल्या नाहीत. सोयाबीनचा ६० दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. अशा परिस्थितीत सोयाबीन पीक शेतात ठेवून करणार तरी काय, या विचाराने हवालदिल झालेल्या उपरोक्त शेतकऱ्यांनी कष्टाने तयार केलेल्या सोयाबीनवर शनिवारी (दि. १२) पोळ्याच्या दिवशी ट्रॅक्टर लावून पूर्णत: नष्ट केले.

निसर्गाच्या लहरीपणामुळे किडीच्या प्रादुर्भावामुळे अचलपूर तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची स्थिती फारच गंभीर बनली आहे. शेतकरी आत्महत्या आणि कर्जबाजारीपणाचा मुद्दा निवडणुकीचा काळात उपस्थित करून ,शेतकऱ्यांना मोठमोठी आश्वासने देऊन भाजपने केंद्रासह राज्यात सत्ता स्थापन केली. मात्र,सत्ता हाती येताच या सरकारला शेतकऱ्यांचा विसर पडल्याचा आरोप शेतकरी वर्गातून होत आहे. दरम्यान, अचलपूर तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची स्थिती पाहता तातडीने सर्व्हेक्षण करून आर्थिक मदत जाहीर करावी,अशी मागणी आता जोर धरत आहे.

दुर्दैवी प्रसंगाचा केला सामना
कर्जघेऊन मोठ्या कष्टाने उभे केलेले सोयाबीनचे पीक ऐन पोळ्याच्या दिवशी स्वत:च नष्ट करण्याचा प्रसंग सुनील जनार्दन उल्हे आणि संजय देऊळकर या दोन शेतकऱ्यांवर ओढवला आहे. अशीच परिस्थिती परिसरातील इतर शेतकऱ्यांचीसुद्धा आहे.

सोयाबीन पीक आले धोक्यात
साेयाबीनवरआलेल्या रोगामुळे तालुक्यातील हजारो हेक्टरमधील सोयाबीन पीक धोक्यात आले आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे नापिकीचा सामना करणारा शेतकरी पूर्णपणे आर्थिक संकटात सापडला आहे.त्याला मदतीची खरी गरज आहे.

शेतकऱ्यांचे मनोबल खचले
तालुक्यातीलशेतकरी विविध चिंतेने ग्रस्त आहेत. त्यातच सोयाबीनवर आलेल्या रोगामुळे पिकांना जबर फटका बसला आहे. त्यात भरीस भर पावसाने दांडी मारल्याने शेतकऱ्यांचे मनोबल खचले आहे. भविष्याची चिंता त्यांना सतावत आहे.

अशी वेळ कुणावरही येऊ नये
सोयाबीनवरआलेला रोग पावसाने मारलेली दडी यामुळे सोयाबीनला अद्यापही शेंगा आल्या नाहीत. आता सोयाबीन ठेवूनदेखील काहीही फायदा नाही. त्यामुळेच घाम गाळून उभ्या केलेल्या सोयाबीनवर ट्रॅक्टर चालवण्याची दुर्दैवी वेळ आली आहे.'' सुनीलउल्हे, शेतकरी,कोल्हा.