आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Special Service Medal Announced To 4 Police Officers

सहा पोलिस अधिकाऱ्यांना विशेष सेवा पदक जाहीर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - महाराष्ट्र पोलिस दलात कार्यरत असलेले जे पोलिस अधिकारी नक्षलग्रस्त भागात दोन वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक काळ सेवा देतात त्या अधिकाऱ्यांना पोलिस महासंचालकाकडून विशेष सेवा पदक जाहीर होते. अमरावती आयुक्तालयातील तीन ग्रामीण पोलिस दलातील तीन अशा एकूण सहा अधिकाऱ्यांना ‘विशेष सेवा पदक' जाहीर झाले असून, त्यांना मंगळवारी (दि. २६) पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते या पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे.
नक्षलग्रस्त भागात खडतर सेवा पूर्ण करणाऱ्या अधिकाऱ्यांना हे पदक दिले जाते. २०१६ मध्ये या पदकासाठी पोलिस आयुक्तालयाच्या सायबर सेलचे प्रमुख एपीआय कांचन पांडे, राजापेठ ठाण्याला कार्यरत असलेले एपीआय उज्ज्वल इंगोले तसेच याच ठाण्यात असलेले उपनिरीक्षक विनोद कांबळे या अधिकाऱ्यांना विशेष ‘सेवा पदक' जाहीर झाले आहेत. एपीआय पांडे यांनी २०१० ते २०१३ या काळात गडचिरोली परिक्षेत्र कार्यालयातील गोपनीय विभागात तसेच कुरखेडा पोलिस ठाण्यात कार्यरत होते. तसेच एपीआय इंगोले हे २०११ ते २०१४ या काळात गडचिराेली जिल्ह्यात कार्यरत होते. या काळात त्यांनी दीड वर्ष झिंगानूर पोलिस ठाणे ता. सिरोंचा या ठिकाणी त्यानंतर गडचिरोली येथे ऑपरेशन सेलमध्ये काम केले.

पीएसआय विनोद कांबळे हे २०१२ ते २०१५ या काळात गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विभागात कार्यरत होते. याच वेळी अमरावती ग्रामीण पोलिस दलात कार्यरत असलेले मंगरुळ दस्तगीरचे ठाणेदार एपीआय अमित वानखडे, मोर्शी ठाण्याला कार्यरत असलेले एपीआय सुजीत कांबळे आणि दर्यापूर ठाण्यात कार्यरत असलेले एपीआय प्रवीण तडी या तीन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या सहाही अधिकाऱ्यांना मंगळवारी विशेष सेवा पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे.
एपीआयचतरकर, आकरे यांना 'आंतरिक सुरक्षा सेवा पदक' : नक्षलग्रस्तभागात दोन वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक काळ सेवा देणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांना विशेष सेवा पदकाप्रमाणेच आंतरिक सुरक्षा सेवा पदक दिले जाते. २०१६ मध्ये आंतरिक सुरक्षा सेवा पदक अमरावती ग्रामीण पोलिस दलातील दोन अधिकाऱ्यांना जाहीर झाले आहे. यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला कार्यरत असलेले एपीआय नागेश चतरकर ब्राम्हणवाडा थडीला कार्यरत असलेले एपीआय आकरे यांचा समावेश आहे. हे दोन्ही अधिकारी गोंदिया जिल्ह्यात कार्यरत होते.