आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ना मैदान, ना साहित्य तरीही घडवले राष्ट्रीय हँडबाॅलपटू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - ना मैदान, ना साहित्य, ना पोल, ना परंपरा ना खेळाची संस्कृती तरीही मार्गदर्शकांनी दिलेल ज्ञान आणि इतरांपेक्षा काहीतरी वेगळे करून दाखवण्याच्या इच्छेने धामणगांव रेल्वे येथे हॅण्डबाॅल प्रशिक्षक राज रगडे यांनी अनेक राष्ट्रीय खेळाडू तयार केले. त्यापैकी दामिनी बुटलेची नुकतीच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघाच्या शिबिरात निवड झाली होती.
रगडे लहान असताना सध्या अमरावती विद्यापीठाच्या क्रीडा रंजन विभागाचे संचालक अविनाश असनारे यांनी हा खेळ धामणगांवात सुरू केला. तसेच खेळाडूंना प्रशिक्षणही दिले. त्यानंतर माधुरी कोपुलवार यांनी या खेळाचा कसून सराव करून घेतला. ११ वीत शिकत असताना राज्य हॅण्डबाॅल संघटनेचे सचिव डाॅ. हनुमंत लुंगे यांनी या खेळाडूला हेरले. गावांतील खेळाडू असूनही त्याला प्रोत्साहन दिले. आधी विभाग नंतर राज्यस्तरीय स्पर्धेत खेळवले. २०१० मध्ये बीपीएड केले. त्यानंतर खेळासाठी झपाटलेल्या या खेळाडूचा बघता बघता कधी प्रशिक्षक झाला ते त्यालाही कळले नाही.

माझ्या संघातील १३ खेळाडूंना अमरावती संघात मिळाले.तेथून मुलींचाही विश्वास बळावला. त्यानंतर धडाडी दाखवीत २०१३ मध्ये राज्यस्तरीय स्पर्धेत अमरावती जिल्ह्याला सुवर्णपदक जिंकून दिले सातत्याने राष्ट्रीय स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधीत्व केले.

खेळाडू चेंडूसाठी आणायचे ३० रु.
प्रशिक्षक राज रगडे यांना २०१२ मध्ये हृदयविकाराचा धक्का बसला. तत्पूर्वी ते पुण्यात एमपीएससी स्पर्धेची तयारी करीत होते. घरी काही कामानिमित्त आले असताना हा आघात झाला. दोन वर्षे उपचार घ्यावे लागले. घरच्यांनी पुण्याला जाऊ नको असे सांगितले. त्यांचे ऐकून २०१२ मध्येच मुलींना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. धामणगांव रेल्वे येथील गरीब घरचे खेळाडू फारतर चेंडूसाठी ३० रु. घरून आणायचे मोठे दगड ठेऊन गोल पोस्ट तयार केले जायचे. त्यांचा उर्वरित खर्च प्रशिक्षकांनाच करावा लागायचा. कोणतेही साहित्य नाही सहकार्यसुद्धा नाही.