आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंढरपूर यात्रेतून एसटी महामंडळाच्या तिजोरीत २५ लाख जमा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - पावसाने दडी मारल्याने कास्तकारांच्या पेरण्या रखडल्या होत्या. पेरण्या उशिरा झाल्यामुळे बहुतांश नागरिकांनी पंढरपूर वारी रद्द केली. परंतु, असा फटका असतानाही महाराष्ट्र राज्य मार्ग महामंडळाच्या अमरावती विभागावर कुबेराचा धनवर्षाव झाला आहे. तसेच प्रवाशांचा फटका बसूनही विभागाचे यंदाचे उत्पन्न गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत वाढले आहे. यंदाच्या पंढरपूर वारीतून अमरावती विभागाच्या तिजोरीत २५ लाख ३३ हजार २९९ रुपये जमा झाले आहेत.
यंदाही पाऊस लांबल्याने यात्रा प्रभावित होईल, अशी चिन्हे होती. परंतु, पहिल्याच दिवशी अमरावती अागारातून पंढरपूरसाठी गाड्या सोडण्यात आल्या. भाविकांचा प्रतिसाद अधिक लाभल्याने अमरावती विभागाला विठुराया पावला आहे. जिल्ह्यातील एकूण आठ आगारांमध्ये ६१ वाहनांतून १२१ फेऱ्या सोडण्यात आल्या. यामध्ये अमरावती विभागातून सर्वाधिक १६ गाड्या सोडण्यात आल्या. पंढरपूरसाठी दरवर्षी विशेष गाड्या साेडल्या जातात.पंढरपूर यात्रेच्या नियोजनासाठी प्रादेशिक व्यवस्थापक एम. बी. पटारे, विभागीय वाहतूक नियंत्रक के. एम. महाजन, वाहतूक अधिकारी अरुण सिया, एम. आर. राठोड, अमरावतीचे आगार व्यवस्थापक श्याम खानझोडे, स्थानकप्रमुख अभय बिहुरे िजल्ह्यातील आठ आगारांचे व्यवस्थापक, चालक वाहकांनी परिश्रम घेतले.

उत्पन्न वाढीवर दिला होता भर
आषाढी दर्शनातून महामंडळाचे उत्पन्न वाढीवर भर देण्यात आले. पावसामुळे निश्चितच यात्रेवर परिणाम झाला. परंतु, उत्पन्न गेल्या वर्षीपेक्षा वाढले आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी जिल्ह्यातून पंढरपूरला जाणाऱ्या भक्तांसाठी विशेष गाड्यांचे नियोजन केले होते. यात अमरावती आगारातून सर्वाधिक गाड्या सोडण्यात आल्या. अरुण सिया, विभागीय वाहतूक अधिकारी,अमरावती.